नागपूर :-दिनांक, १३.०५.२०२३ चे २३.३० वा. चे सुमारास पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत गंगानगर काटोल रोड, येथे फिर्यादी राकेश हरिभाउ उक्कर वय ३२ वर्ष गंगानगर, खदान हे उभे असतांना आरोपी अनमोल सुरेन्द्र रामटेके वय ४० वर्ष रा. सुरेन्द्रगड, गुप्ता चौक, गिट्टीखदान याने त्याचे साथिदारा सोबत येवुन फिर्यादीस तु माझे पत्नी सोबत का बोलतो असे म्हणून भांडण करून फिर्यादीस शिवीगाळ केली व लाकडी दांडयाने डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच मारण्याची धमकी दिली. जख्मी फिर्यादीवर उपचार करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस थाणे गिट्टीखदान येथे पोउपनि चिठोले यांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.