नागपूर :-फुले दाम्पत्यांचे अंगरक्षक आद्य क्रांतिकारक लहुजी उस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंती निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने लहुजी साळवे उद्यान (अंबाझरी गार्डन) नागपूर येथे त्यांना जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे ह्यांच्या नेतृत्वात माल्यार्पण करुन, स्फूर्ती दायक घोषणा देऊन अभिवादन केले.
लहुजी वस्ताद ह्यांनी इंग्रजी राजवटी च्या विरोधात संघर्ष केला, पुढे प्रस्थापित ब्राम्हणांनी सावित्रीबाई व महात्मा फुले ह्यांना त्रास देणे सुरु केले त्यावेळी लहुजी स्वतः त्यांचे अंगरक्षक बनून पुढे आले, परिणामतः जातीयवाद्यांना माघार घ्यावी लागली, लहुजी हे आमच्या महापुरुषांचे रक्षक असल्याने त्यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केल्या गेली अशी माहिती बसपा नेते उत्तम शेवडे ह्यांनी या प्रसंगी दिली.
या प्रसंगी अभिलेश वाहने, नितीन वंजारी, सदानंद जामगडे, मनोज गजभिये, अभय डोंगरे, संभाजी लोखंडे, बबिता डोंगरवार आदी आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.