नागपूर :-दोषसिध्द आरोपी चेतन विश्वनाथ मुंडले, वय ३० वर्ष रा. चापेगडी ता. कुडी याच्या विरुध्द पोस्टे कुही येथील अपराध क्र. २५/२०१६ कलम ३५४, ३४२ ५०६ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुलगीर यांनी केला व गुन्हयाचे दोषारोपपत्र मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी कुही याच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते.
सदर गुन्हयातील पिडीत साक्षदार व पंचांचे बयान तसेच आरोपी विरूद्ध उपलब्ध पुराव्याची पडताळणी करुण मा. न्यायालयाने सदर गुन्हयाचा अंतीम सुनवाई दरम्यान दिनांक २६ / ०९ / २०२३ रोजी आरोपी विरुद्ध दोषसिध्द झाल्याने आरोपीस ०१ वर्ष कारावास व ४०००/- रू. आर्थीक दंडाची शिक्षा सुनावली सदर केसमध्ये सरकारी वकील अँड विलास मिरवे यांनी शासनाची बाजु मांडली. सदर गुन्हयात पोलीस पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर पोस्टे कुही, कोर्ट पैरवी राहुल देवीकर, अमीत आजबले यांनी साक्षदारांना योग्यपणे सावसंबंधाने ब्रिफ करून आरोपी विरुद्ध गुन्हा दोषसिध्द करण्यास महत्वाची भुमीका पार पाडली.