अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपी दांपत्यांना छिंदवाडा मध्यप्रदेश येथून केले जेरबंद

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणने अवघ्या ७२ तासांत आरोपींचे ताब्यातुन पिडीत बालकाची सुरक्षित सुटका केली

नागपूर :- दि. १८/११/२०२३ रोजी कळमेश्वर हद्दीतील लोणारा शेत शिवारात राहणारे केशव श्रीराम आर्य वय ७० वर्ष रा. लॉट नं. २० सुबोध नगर, नागपूर यांनी त्यांचे शेतात काम करण्याकरीता सोनू व त्याची पत्नी गिता रा. छिंदवाडा (मध्यप्रदेश) या दांपत्यांना सुमारे ८ महिण्यापासून शेतमजुरीच्या कामावर ठेवले होते. सोनू त्याची पत्नी गिता व मुलगी नम्रता वय ८ वर्ष असे फिर्यादीचे शेतावर रहात होते. सुमारे ८ महिण्याचा पगार शेतमालक केशव आर्य यांनी या दोन्ही दांपत्त्यांना दिला नव्हता, त्यामुळे पगारासाठी त्यांनी शेतमालकाकडे तगादा लावला. मालक पगार देत नाही हे सोनू व गित्ता हयांचे लक्षात आले त्यामुळे त्या दोघानी दि. १८/११/२०२३ रोजी पहाटे ६.०० वाजताचे सुमारास केशव आर्य यांची बजाज लॅटीना मोटरसायकल आणि २५,०००/- रुपये रोख रक्कम चोरी केले व केशव आर्य यांच्या साळीचा मुलगा  आदीत्य वय १२ वर्ष याचे अपहरण केले. सोनू याने त्याची पत्नी गिता, मुलगी नम्रता व आदीत्य यांचेसह केशव आर्य यांने मोटरसायकलने लोणारा (कळमेश्वर) येथून पलायन केले. या घटनेची माहिती केशव आर्य यांनी पोलीस ठाणे कळमेश्वर येथे येवून दिली असता सोनू व त्याचे पत्नीचे विरुध्द आदीत्यचे अपहरण केल्याचा गुन्हा कळमेश्वर पोलीसांनी नोंद करुन तपास सुरु केला. सदर घटनेची माहिती नागपूर ग्रामीणने पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांना प्राप्त होताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथके तयार करुन कळमेश्वर पोलीसांना व विशेष पथकास आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले.

सदर गुन्हयातील आरोपी व अपहृत बालकाचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कळमेश्वर हद्दीतील तसेच नागपूर येथील बस स्थानके, रेल्वे स्टेशन, मार्केट परिसर अशा विवीध ठिकाणी शोध सुरु केला, तसेच तांत्रीक पध्दतीने तपास सुरु केला, त्याचप्रमाणे गोपनिय बातमीदार नेमुन आरोपी व अपहृत बालकांचे शोध कार्यरात्रं दिवस सुरु ठेवले. या शोध मोहिम दरम्यान स्थागुशाचे पथकास आरोपीचे नाव प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाने रा. छिंदवाडा तसेच आरोपीची पत्नी हिचे नाव गिता कौरती ग. जुन्नारदेव जि. छिंदवाडा असे असल्याची खात्रीशिर माहिती हाती लागली. त्यावरुन पोलीसांनी मध्यप्रदेश येथील छिंदवाडा जिल्हयात जावून आरोपी व अपहृत बालकाचा शोध सुरु केला. यादरम्यान समजले की, आरोपी हा त्याने पत्नीसह छिंदवाडा शहरातील चौरसिया मोहल्ला येथे येणार आहे. त्यानुसार विशेष पथकाने चौरसिया मोहल्ला येथे आरोपीचा शोध घेण्याकरीता सापळा रचला. दि. २१/११/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजताचे सुमारास आरोपी व त्याची पत्नी एका लहान मुलीसह दिसून येताच त्यांना ताब्यात घेतले आरोपीने त्यांची ओळख १) प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाने वय ३५ वर्ष, २) गिता गुरुप्रसाद कौरती वय २८ वर्ष आणि ३) नम्रता गुरुप्रसाद कौरती वय ०८ वर्ष सर्व रा. कालीछापारनं, २, दमुहातह, दमुखजि, छिंदवाडा, असे सांगुन आरोपी प्रविण व त्याची पत्नी गित्ता यांनी आदीत्यचे अपहरण केल्याचे सांगीतले, त्यानंतर आरोपीस अपहृत मूलगा आदीत्य हा कुठे आहे याबावत विन्चारले असता त्यांनी आदीत्य याला छिंदवाडा येथील अर्जुन प्रकाश जाधव वय ३० वर्ष, व अमन कैलाश चौरसिया वय २८ वर्ष यांचेकडे ठेवल्याची माहिती दिल्याने क्षणाचाही विलंब न करता तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अर्जुन व अमन याचे घरी जावून आदीत्य याचा शोध घेतला असता तो मिळून आला, तपास पथकाने व कळमेश्वर पोलीसांनी अतिशय कौशल्यपूर्ण संवेदनशिल सदरचे प्रकरण हाताळले तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे सापळा रचून दोन्ही आरोपी दांपत्यांना ताब्यात घेवून अपडत बालक आदीत्य याची सुटका सरक्षितरित्या केली. आरोपी व अपहृत बालकास पुढील तपास प्रक्रियेकरीता कळमेश्वर पोलीसांचे स्वाधिन केले, सदर गुन्हयाने चौकशी दरम्यान माहिती मिळाली की, आरोपी प्रविण उर्फ सोनू हरिराम पंडाने हा सराईत अपराधी असून त्याचेवर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विवीध जिल्हयात खून, दरोडा, जवरी चोरी, घरफोडी, चोरी अश्याप्रकारचे गुन्हे नोंद आहे.

सदर कार्यवाही हो नागपूर आमीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, सावनेरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधीकारी बापू रोहम, यांचे मार्गदर्शनात ओमप्रकाश कोकाटे, पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, आशिष ठाकुर, पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पडि, सहा, फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, निलेश बर्वे, संजय बानते, इक्बाल शेख, विनोद काळे, प्रमोद तभाने, अमोल कुथे,मुकेश शुक्ला तसेच पोलीस नायक सतिष राठोड, सुमीत बांगडे स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण तसेच पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील पोलीस निरीक्षक श्री यशवंत सोलसे, सपोनि दिलीप पोटभरे, तेजराम मेश्राम, सफी जमन्नान नौरंगाबादे, पोलीस हवालदार पंकज गाडगे, वानखेडे, पोलीस शिपाई राणा सिंग, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, महिला पोलीस हवालदार स्नेहा ढवळे, पोलीस नाईक सतिश राठोड यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोस्टे कुही हद्दीतील वडद पारधी बेडा येथे अवैधरित्या मोहाफूल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

Wed Nov 22 , 2023
कुही :-पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. २१/११/२०२३ रोजी वडद पारधी बेडा येथे मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमावर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०१ महिला व ०३ पुरूष आरोपी नामे १) रविन्द्र मोरेश्वर पवार वय ३४ वर्ष, २) रूशी यजु माळी वय ३२ वर्ष ३) जितेश रसवंत पवार वय ३२ वर्ष हे मोहाफुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!