केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत दहा हजार व दोन लाख कर्जाचे वाटप आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आले

मनमाड :- स्टेट बँक ऑफ मनमाड मुख्य शाखा या कार्यालयात आमदार सुहास (आण्णा) कांदे , नांदगाव विधानसभा मतदार संघ, यांचे अध्यक्षतेखाली आणि डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक मनमाड नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली मनमाड नगरपरिषदमार्फत राबवल्या जाणार्‍या केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) प्रधान मंत्री आत्मनिर्भर निधि (PM-SVANidhi), प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) अशा विविध प्रकारच्या लाभाच्या योजना मनमाड शहरातील गरीब व गरजू सुशिक्षित बेरोजगार लाभार्थ्यांना मनमाड नगरपरिषद आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाड यांचे सयुक्त विद्यमाने ‘मै भी डिजिटल 4.0’ या प्रशिक्षण मोहिमेअंतर्गत 200 पेक्षा जास्त पथविक्रेते आणि काही स्वयंरोजगार कर्ज वितरित केलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुहास (आण्णा) कांदे, डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद, यांचे हस्ते विकास कुलकर्णी, व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया, मनमाडचे मार्फत 20 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 8 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज व 2 लाभार्थयाना रिक्शा वितरित करण्यात आले तर अनिरुद्ध भालेराव, व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मनमाडचे मार्फत 08 पथविक्रेते यांना प्रत्येकी 10000/- आणि स्वयंरोजगार वैयक्तिक कर्ज घटकाअंतर्गत 05 लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये 2 लक्ष कर्ज वितरित करण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना संदीप आगोणे, शहर व्यवस्थापक, मनमाड नगरपरिषद यांनी केली, तर शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या अंजुंम कांदे यांनी महिलांच्या शास्वत रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी शहारच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी सध्या कार्यान्वित असणारी करंजवन पाणीपुरवठा योजना बाबत माहिती दिली. शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे यांनी मनमाड शहरात लवकरच MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्योग व्यवसाय सुरू होणार असल्याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा संसाधव व्यक्ति सीमा वानखेडे यांनी प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) याबाबत माहिती दिली. डॉ. सचिनकुमार पटेल, मुख्याधिकारी तथा प्रशासक, मनमाड नगरपरिषद यांनी नगरपालिका मार्फत राबण्यात येणार्‍या सर्व लाभाच्या योजना आणि शहारच्या सर्वांगीण विकास प्रणालीबाबत माहिती दिली. शेवटी अध्यक्षीय भाषणात आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी शहारच्या रोजगाराच्या शास्वत योजना आणण्याची घोषणा केली. मनमाड शहरात भव्य कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारून त्यातून महिलाना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे साधन निर्माण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. महिला बचत गटांना उत्पादित मालास स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाईल असे संगितले.

कार्यक्रमाचे आभार रेखा गांगुर्डे, समूह साधन व्यक्ति, न.प. मनमाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक पाईक, कार्यालय अधीक्षक, न.प. मनमाड, ज्ञांनेश्वर जाधव, कृषि कर्ज, एसबीआय बँक, योजनेचे समुदाय संघटक श्रीवर्धन कुशारे, अर्चना आव्हाड, शिवसेना उप प्रमुख  सुनील हांडगे शिवसेना संघटक, विद्या जगताप आणि संगीता बागूल , शिवसेना शहर अधिकारी योगेश इमले व आसिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते दिलावर शेख आणि मीर अहेमद यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा मुख्यालयात दोन सायकल स्टँडचे लोकार्पण

Fri Feb 10 , 2023
नागपूर स्मार्ट सिटीचा पुढाकार : पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला मिळणार प्रोत्साहन नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालय परिसरात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने नागरिकांसाठी दोन सायकल स्टॅन्ड ची सुविधा करण्यात आली आहे. या सुविधेचे लोकार्पण नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता.९) केले. नागपूर स्मार्ट सिटीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com