संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई व कामठीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांची तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता कांग्रेस तर्फे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी कार्यालय मध्ये सभापती अनिकेत शहाणे ,उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या हस्ते हुकूमचंद आमधरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी समितीचे संचालक सुधीर शहाणे, भाऊराव गौरकर,अमोल खोडके,लंकाबाई वाघ,लता आखरे,रमेश गोमकर,सुर्यभान करडभाजने,कृष्णाजी करडभाजने, नवलकिशोर दडमल,सचेलाल घोडमारे,राजु भालेराव सहकारी संस्था कामठीचे सहाय्यक निबंधक अनिल गोस्वामी व सचिव विकास बोबडे व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.