बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली – ना. सुधीर मुनगंटीवार

– बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दिली मानवंदना

चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमते विरोधात लढा दिला. समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशी भावना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पिरीपा (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त ना.सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील मुख्य चौकात स्थित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका ते मुख्य चौकातील पुतळ्यापर्यंत पदयात्रा करीत बाबासाहेबांना मानवंदना दिली.

यावेळी माजी आमदार नाना शामकुळे,महानगर अनुसूचित जातीचे जिल्हाध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे , भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, जयश्री जुमडे, गटनेते देवानंद वाढई, राहूल घोटेकर, छबू वैरागडे, राजेंद्र अडपेवार,राजेंद्र खांडेकर, सविता कांबळे, संगीता खांडेकर, शितल आत्राम, अरूण तिखे, अनुराधा हजारे, शिला चव्‍हाण, पुष्‍पा उराडे, वंदना जांभुळकर, चंद्रकला सोयाम, शितल गुरनुले, , सचिन कोतपल्‍लीवार, रवि लोणकर, रेणु घोडेस्‍वार, पुरूषोत्‍तम सहारे, प्रभा गुडधे, महेंद्र जुमडे, राजेश थुल, सागर भगत, निलेश हिवराडे, जितेंद्र वाकडे, वंदना संतोषवार, पुरूषोत्‍तम सहारे, चंदन पाल, चांद पाशा, रितेश वर्मा, प्रमोद क्षीरसागर, सतीश तायडे, सत्‍यम गाणार, गणेश रामगुंडेवार, संदीप देशपांडे, स्‍वप्‍नील कांबळे, सुरेश हरिरमानी, अमोल नगराळे, विक्‍की मेश्राम, सागर भगत, हर्ष महातव, मनीषा महातव, डॉ प्रमोद रामटेके, रतन मेश्राम, राहुल नगराळे अमित निरंजने आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजश्री पाटील च्या प्रचारासाठी गोपिचंद पडळकरांचा प्रचाराचा झंजावात

Mon Apr 15 , 2024
यवतमाळ :- भाजपाचे फायरब्रांड नेते गोपिचंद पडळकर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत. पडळकर उद्या दि. १५ एप्रिल रोजी जिल्हा दौरयावर येणार असुन ते लोकसभा मतदार संघातील पुसद, दारव्हा, यवतमाळ‍ आणि बाभुळगाव तालुक्यात सभा घेणार आहेत. भारतीय जनता पक्षातील उमदे वक्ते तथा फायरब्रांड नेते म्हणुन ओळखले जाणारे गोपिचंद पडळकर आज जिल्हयात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com