नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीची बैठक

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरण संदर्भात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०३ ) टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली.

मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सूलभा शेंडे, डॉ देवस्थळे, डॉ मालखंडाले, दीपाली नागरे, दीपाली पवार शिक्षण विभागाचे संजय दिघोरे यांच्यासह/CDPOS बालविकास प्रकल्प अधिकारी, Lions Club चे प्रतिनिधी लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, आशा सेविका व इतर प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होत.

बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी नियमित लसीकरणाचा आढावा घेतला. ज्या भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असेल अशा ठिकाणी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती निर्माण करावी, गरजेनुसार नागरिकांचे समुपदेशन करावे, लसीकरण वाढविण्यासाठी संबंधित अधिकारी, झोनल अधिकाऱ्यांनी युपीएचसी स्तरावर अंगणवाडी कर्मचारी, आशा एएनएम आदी कर्मचाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन करावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा व एएनएम यांच्या नोंदवहीची नियमित तपासणी करावी. असे निर्देश श्रीमती गोयल यांनी बैठकीत दिले. याशिवाय बालकांच्या लसीकरणासाठी महिला आरोग्य समितीच्या सदस्यांचा सहभाग वाढवा याकरिता नियमित बैठक घेण्यात यावी, असेही निर्देशही श्रीमती गोयल यांनी दिले. शिवाय वैद्यकीय अधिकारी व झोनल वैद्यकीय अधिकारी यांनी लसीकरण सत्रास भेटी द्याव्या व हेड काऊंट सर्व्हे तपासण्याच्या सुचना आंचल गोयल यांनी दिल्या.

तसेच बैठकीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी अतिदक्षता परिसरात ‘हाय रिस्क एरिया’ मध्ये जाऊन लसीकरणाविषयी जनजागृती करावी, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी देखील प्रत्यक्ष जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. मोबाईल लसीकरण व्हॅनद्वारे लसीकरणाला गती आणावी आणि बालकांचे वेळेत लसीकरण होईल याची काळजी घ्यावी. अशा सूचना दिल्या.

बैठकीत सर्वप्रथम प्रजनन व बालकल्याण अधिकारी डॉ. सरला लाड यांनी गत महिन्यात लसीकरणापासून वंचित व उशिरा झालेल्या लसीकरणाबाबत माहिती दिली. तर जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे नियमित लसीकरणाची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन तंत्रज्ञाना द्वारे खांद्दयाच्या समस्यांवर दुर्बिण शस्त्रक्रिया

Thu Jul 4 , 2024
– नागपुरातील डॉ. सतिश सोनार यांनी सामान्य रुग्णांसाठी जगातील नवीनतम तंत्रज्ञान जाणून घेतले नागपुर :- डॉ. सतीश भा.सोनार हे भारतातील प्रसिद्ध आर्थ्रोस्कोपी आणि खांदा सर्जन आहेत. ते जगभरातील काही सर्जनांपैकी एक आहे हे विशेष: आणि ते क्रीडा ऑर्थोपेडिक्सचु प्रैक्टिस करत आहेत. इ. सन. 2007 नंतर या क्षेत्रात नागपुरातील ते पहिलेच डॉक्टर आहेत. त्यांनी हजारो क्रीडा व्यक्तीवर आणि खांद्यापासून घोट्याच्या अस्थिबंधनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com