किटकजन्य आजारांपासून बचावाच्या दृष्टीने काळजी घ्या, मनपाचे नागरिकांना आवाहन

नागपूर :- पावसाळ्यात उद्भवणा-या डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या यासारख्या किटकजन्य आजारांपासून स्वत:चा आणि परिवारातील सदस्यांचा बचाव व्हावा यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे.

नागपूर शहरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे जागोजागी पाणी साचण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. या परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या यासारखे किटकजन्य आजार वाढण्याची शक्यता आहे. यासारखे आजार नागरिकांना होउ नये यादृष्टीने दक्षता घेण्यात यावी. सतर्कतेच्या दृष्टीने स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे करण्यात येत आहे.

मनपा हिवताप व हत्तीरोग विभागाद्वारे जानेवारी २०२३ ते २० जुलै २०२३ पर्यंतची शहरातील डेंग्यू रुग्णांच्या स्थितीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार जानेवारी (२०२३) पासून ते २० जुलै २०२३ पर्यंत शहरात डेंग्यूचे ४६० संशयीत आढळले. यापैकी ५२ डेंग्यू रुग्ण निष्पन्न झाले. जानेवारी महिन्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या ५ होती. यामहिन्यात संशीयांती संख्या ६६ होती. फेब्रुवारी महिन्यात ४ (संशयीत रुग्ण ३३), मार्च महिन्यात ४ (संशयीत रुग्ण ३१), एप्रिलमध्ये ३ (संशयीत रुग्ण ५६) तर मे महिन्यांत डेंग्यू रुग्णांची संख्या २ (संशयीत रुग्ण ४४) याप्रमाणे होती. जून २०२३ मध्ये डेंग्यू रुग्णांचा आकडा १५ झाला असून २० जुलै २०२३ रोजी डेंग्यू रुग्णांची संख्या १९ वर गेली आहे. जूनमध्ये ७९ संशयीत डेंग्यू रुग्ण तर जुलैमध्ये १५१ संशयीत डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

डेंग्यूपासून बचावासाठी खालील बाबींचे पालन करा

– पावसाळा सुरू झाल्यामुळे कुलर बंद करून त्याला कोरडा पुसुन टाकी पालथी करून ठेवावी

– घरासभोवताल पाणी जमा होऊ देऊ नये, पाणी असल्यास त्याला वाहते करावे

– पाणी साठवण्याची भांडी अथवा टाकी झाकुन ठेवावी

– गच्चीवर असलेल्या भंगार वस्तूंमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी

– फ्रीजच्या मागे असलेला ट्रे, झाडांच्या कुंड्या किंवा इतर निरूपयोगी वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नये पाणी असल्यास ते स्वच्छ करावे

– कोणत्याही प्रकारचा ताप आल्यास लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी

– स्वत:हून कोणत्याही आजारावर उपचार करणे टाळावे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरात चोरी झारखंडमध्ये विक्री

Fri Jul 21 , 2023
– झारखंडची टोळी पोलिसांच्या जाळ्यात नागपूर :- प्रवाशांचे मोबाईल चोरी करून झारखंडच्या विविध गावात कवडीमोल भावात त्याची विक्री करणार्‍या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेख सोबराती शेख साबीर (28), शेख बाबर शेख असलम (22), दोन्ही रा. साहेगंज, झारखंड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा आहे. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेवून बालगृहात पाठविले. नागपुरातील रहिवासी रुपेश कांतीलाल यांची पत्नी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com