घरकुल योजनेचा लाभ घ्यावा

गडचिरोली: सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली व्दारा विमुक्त जाती भटकया जमाती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी वैयक्तीक घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.सदर घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांनी संबंधित ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती,गटविकास अधिकारी यांचे मार्फत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयास अर्ज सादर करावे.

विमुक्त जाती,भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी. त्यांना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तीक घरकुल योजना व धनगर समाज प्रवर्गातील घटकांसाठी धनगर समाज घरकुल योजना सन 2018-19 पासुन इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येते.

ग्रामीण भागात किमान 10 कुटुंबासाठी सामुहिक वसाहत योजना राबवुन अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यासाठी सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचे प्रमाणपत्र,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाख पेक्षा कमी असल्याचे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र,कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे 100 रु. स्टॅम्प पेपरवर शपथपत्र,लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर, भुखंड असल्याचा पुरावा,नमुना-8 किंवा 7-12 उतारा दस्त नोंदणीची प्रत,अर्जदाराचे आधार ओळखपत्र,बँक पासबुक, राशन कार्ड,जॉबकार्ड,घरकर पावती,ग्रामसभेचा ठराव आदी कागपत्रासह अर्ज संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सादर करावे. अधिक माहिती करीता 07132-222192 या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणेबाबत

Thu Jan 12 , 2023
गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.एटीटीएस-2016/प्र.क्र.125/अजाक दि. 08 मार्च 2017 नुसार “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे” या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाना देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम रु. 03.15 लाख बचत गटांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com