स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने दि. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 46 अन्वये विधान परिषदेत केले.

या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

Fri Mar 3 , 2023
मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली.           मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अडचणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com