स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची दंडात्मक कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.9) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत शॉप नं.73A, धंतोली येथील सेवा सर्जिकल ॲण्ड ड्रग्ज यांच्याविरुध्द रस्त्यालगत क्लिनिकचा कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत प्लॉट नं.41, रामदासपेठ येथील R Sandesh Construction यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बजाज नगर, काचिपुरा रोड येथील Leafy Roof the Better Stores यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत गणेशपेठ येथील DNR Travels यांच्याविरुध्द कार्यालयातील सामान्य कचरा मोठया प्रमाणात रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सतरंजीपूरा झोन अंतर्गत झेंडा चौक, इतवारी येथील Sahu Clinic यांच्याविरुध्द रस्त्यालगत क्लिनिकचा कचरा सामान्य कच-यासोबत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत जरिपटका येथील Capsline Pets Shop यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनसंवाद सभेत आमदार बावनकुळेनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

Wed Nov 9 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठीकरांना हिवाळी अधिवेशनादरम्यान दिवाळी भेट मिळणार! कामठीतील पाच हजार अतिक्रमण धारकांना राज्याचे उपमुख्यमंत्रीच्या हस्ते पट्टे वितरण होणार! कामठी :- कामठी तालुक्यातील नागरिकांच्या प्रलंबित समस्याचे तडकाफडकी निराकरण करीत लोकसेवा द्यावी तसेच प्रशासनिक अडी अडचणी दूर होऊन समस्या मार्गी लागाव्या यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार टेकचंद सावरकर यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी येथील एम टी डी सी सभागृहात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com