राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी मध्ये सरपंच उपसरपंच व सदस्यांनी घेतले ग्रामविकासाचे प्रशिक्षण.

पारशिवनी :- राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत पंचायतराज प्रशिक्षण केंद्र नागपूर व पंचायत समिती पारशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहामध्ये नवनिवाचित २१ ग्राम पंचायत चे सरपंच, उपसरपंच ,ग्राम पंचायत सदस्य यात वाघोडा तामसवाडी,डूमरी कला, गोंडे गाव,मेहंदी,जुनी कामठी साटक नादगाव बखारी नयाकुड मेहंदी पालारा दहेगाव जोशी करभाड सालई तसेच अन्य ग्राम पंचायती चे येथील नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी ग्रामविकासाचे तिन दिवसिय प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणामध्ये त्यांना 73 वी घटना दुरुस्ती, सभा कामकाज, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८-५९ महत्त्वाच्या तरतुदी,सरपंच सदस्यांचे कर्तव्य, जबाबदारी व अधिकार,उत्पन्नाची साधने,१ ते 33 नमुने,ग्रामपंचायत विकास आराखडा, खरेदी प्रक्रिया, लेखासहिता२०११, इत्यादींविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले.तसेच शासनाच्या योजना याविषयीचे मार्गदर्शन त्यांना करण्यात आले.

१ ते ३३ नमुने, अंदाजपत्रक यावर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला मुख्या मार्गदर्शक म्हणून सविता झाडे प्रवीण्य प्रशिक्षक वर्धा,अर्पिता बांन्ते नागपूर वैशाली चव्हाण नागपूर यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले.

समारोपीय कार्यक्रमाला गटविकास अधिकारी जाधव  प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अभय बन्सोड ,पुरुषोत्तम निंम्बर्ते व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजय नाईक यांनी प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

या प्रशिक्षणामध्ये क्षेत्रीय भेटीचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत निंबा या गावाला भेट देऊन रुफ वाटर हार्वेस्टिंग,सोलरवर पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय, दुमजली शाळा भेट देऊन पाहणी केली.

आभार प्रदर्शन वाघोडा ग्राम पंचायत चे उपसरपंच विलास गिर्हे यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com