स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.22) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधाई रेसीडेंसी, दिवान ले-आऊट, मानेवाडा, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्वालंबन इस्टेट, मनिष नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व फुटपाथवरील चेंबरचे नुकसान केल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.

नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रकाश शास्त्रकार, कामगार नगर, नागपूर, यांच्यावर मोकळया प्लॉटचा मलबा फुटपाथवर टाकल्याबद्दल 5 हजार दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिव किराणा शॉप, भाजी मंडी, इतवारी, नागपूर, यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जीनियस टयुशन क्लासेस, नारी रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्याचं 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वच विभागांनी आवश्यक पावले उचलावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

Wed Aug 23 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भातील बैठकीत जिल्हा केंद्र मानून विकासयोजना राबवण्याच्या सूचना -उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई :- महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दीष्ट 2028 पर्यंत पूर्ण करायचे असेल तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या बरोबरीनं सर्वच विभागातील जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल. कृषी, कृषीपुरक उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, दळणवळण, गृहनिर्माण, मध्यम व लघूउद्योग, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com