बीजेपी ची आज 15 वर्ष पूर्ण – महापौर यांना आप ची १५ प्रश्न !

बीजेपी च्या 15 वर्ष कर्यकाळाच्या कामाचे आप ने विचारले 15 प्रश्न

महापौर यांचा 15 प्रश्न असलेले ग्रीटिंग स्विकारन्यास नकार

नागपुर – बीजेपी मनपात सत्तेवर येऊन आज 15 वर्षे पूर्ण झालीत, सोबतच मागची पाच वर्ष राज्यात बिजेपिची सत्ता होती, सत्ता च नाहीतर  मुख्यमंत्री सुद्धा नागपुरातून होते. तर केंद्रात देखील बीजेपी सत्ता आहे आणि नितिन  गडकरी  केंद्रात मोठ्या खात्याचे मंत्री आहेत, त्याची विकास पुरुष म्हणून ख्याती आहे. त्यामुळे नागपूर हे देशातील पहिले स्मार्ट शहर म्हणून घोषित होणे नागपूरच्या जनतेला अपेक्षित होते.

ज्या शहराला केंद्र आणि राज्य सरकारची पूर्ण मदत आहे, ज्या शहरातून देशाची सत्ता चालविण्यात येते, आणि एक हाती सत्ता आहे, त्या शहराचा कायापालट होणे साहजिकच आहे.

ही संपूर्ण विपुल परिस्थिती होती आणि आज नियमानुसार बीजेपीला नागपूर महानगरपालिकेत सत्तेवर येवून तीन टर्म पूर्ण होत आहेत. दीर्घ काळ मनपाच्या माध्यमातून बीजेपीला नागपूरच्या जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली होती, आज त्यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस. एकूणच १५ वर्षेपर्यंत दीर्घ काळ सेवा केल्यानंतर त्या प्रमुख व्यक्तीचा निरोप समारंभ होणे, त्या प्रथम नागरिकाचा स्वागत सत्कार करणे नागपूरच्या जनतेचे कर्तव्यच आहे.

त्यामुळे आज आम आदमी पार्टी कडून महापौर  दयाशंकर तिवारी यांचा आम आदमी पार्टी कडून निरोप सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ, बुके व सोबतच नागपूरच्या जनतेची मुलभूत गरजासंबंधित असलेली १५ प्रश्न असलेले ग्रीटिंग देवून राज्य कोषाध्यक्ष श्री जगजीत सिंग, विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता नागपूरच्या जनतेला १५ वर्षात केलेल्या कार्याचा सविस्तर माहिती मा. महापौर देतील हीच अपेक्षा आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार याच्याकडून मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला विकास निधी आणि महानगरपालिका द्वारे वाढविण्यात आलेले कर या माध्यमातून १५ वर्षाच्या काळात मा महापौर साहेब आपण नागपूर ला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी काय केले, त्याची माहीत आज जनतेला द्यावी, ही विनंती.

१.      OCW ला १५ वर्षात किती रक्कम दिली व एकूण कीती टक्के घरात 24 x 7 पानी पुरवठा केल्या जातो ?

२.      नागपुर शहर टैंकर मुक्त झाले काय ? नाही तर जबाबदार कोण ?

३.      १५ वर्षांपूर्वी मनपाच्या एकूण किती शाळा होत्या, त्यापैकी आज किती चालू आहेत आणि कीती शाळा राष्ट्रीय दर्जाच्या केल्यात ?

४.      मनपा ची कीती दवाखाने आहेत, त्यापैकी किती अद्यवात केलेत ?

५.      मनपा दवाखान्यात कायम स्वरूपी कीती डॉक्टर आहेत ?

६.      १५ वर्षात शहरात किती STP प्लांट लावलेत, नाग नदी, पिली नदी सफाईवर किती खर्च केला व ह्या नद्या साफ झाल्यात का ?

७.      १५ वर्षात तलावांचे सौन्दरीकरण करण्यावर किती खर्च केला आणि कोणते तलाव सुंदर व स्वच्छ केलेत ?

८.      सीटी बस सेवा कीती नफ्यात आहे व ठेकेदाराकडे कीती रक्कम थकीत आहे ?

९.      शहरातील किती किलोमीटर फुटपाथ नागरिकांना चालण्या योग्य आहेत ?

१०.  २०० मीटरवर सार्वजनिक सौचालय (पुरुष व महिला) तयार करणार होते, त्यापैकी कीती तयार केलेत ?

११.  साफ सफाई व कचरा व्यवस्थापन सुरळीत केले काय ?

१२.  कीती आठवडी बाजार स्वच्छ, सुंदर, व्यास्थित व अद्यावत केलेत ?

१३.  शहरात किती ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग व्यवस्था केली ?

१४.  नगरसेवकांना घरटैक्स कमी व इतरांना जास्ती तसेच थकीत टैक्सवर सावकारी व्याज लावण्याचे कारण काय ?

१५.  नागपुर शहर स्मार्ट सिटी बनले का ? नाही तर जबाबदार कोण ?

या प्रसंगी राज्य सह सचिव अशोक मिश्रा, राष्ट्रीय परिषद सदस्य अंबरीश सावरकर, शहर सचिव भूषण ढाकुलकर, विदर्भ युवा अध्यक्ष पियुष आकरे, युवा आघाडी राज्य समिती सदस्य कृतल आकरे, शहर सहसंयोजक राकेश उराडे, विधानसभा संयोजक श्री अजय धर्मे, रोषण डोंगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, आकाश कावळे, विधानसभा संगठन मंत्री प्रभात अग्रवाल, प्रदीप पौनीकर, मनोज डफरे, विधानसभा सचिव गुणवंत सोमकुवर, धीरज आगाशे, सागर जैस्वाल, अलमडोहाकार, सचिन पारधी, प्रतिक बावनकर, कुणाल मंचलवार, अजय कैकाड़े, लता तुमसरे, हेमंत पांडे, वैशाली मांनवंटकर, बबलू मोहाडीकर, जीनेश शाह ,राजेंद्र शेलकर, सद्दाम खान , सोनू फटींग, राजशे शेवाळे
नानक धनवानी, धीरज आगाशे, संजय बारापात्रे, हरीश वेलेकर, विनोद गौर, दीपमाला बारापात्रे, शुभांगी वेलेकर, लक्ष्मीकांत दांडेकर, प्रभात अग्रवाल, संगीता भोसले, विशाखा दुपारे, अक्षय दुपारे, प्रदीप पौनीकर, गुणवंत सोमकुवर, नरेश महाजन, विजय नंदनवार अब्दुल सलाम, पंकज मेश्राम, अर्चना राले, प्रियंका तांबे, स्विटी इंदुरकर, कविता सिंग, कविता उके, क्लामेंट डेविड सुनीत चौरे, शुभम मोरे, सतीश सोमकुवर, जगदीश रोकडे, राजकुमार बोरकर, सुहेल गणवीर, पीयूष दहाट धीरज पाटील, शुभम मोरे, अविनाश सोर्ते, रविकांत गोखले, प्रतिक लांजेवार , सद्दाम खान, आफराज अहमद जावेद मालाधारी, सोहेल कादरी शेख, फय्याज, जुनंनो अफसर मलीक, लखन शाहू, साहिल शेख, मोबिन सिद्दिकी , शहजाद, मोहसीन शेख, राजा कुरेशी, राजा शाहू, डॅनिश खान, असलम शेख, जाबिर तुरक, इर्शाद मालाधारी, मोहम्मद शोएब, संघम चाहांदे, अजय धर्मे,  संतोष वैद्य, सुरेश खर्चे, विनोद अलमदोहकर, शिरीष तिडके, प्रमोद नाईक, प्रवीण चौधरी, पुष्पा डाभरे, गौतम कावरे, मुन्ना भाई शर्मा, अरविंद वानखेडे,  प्रताप गोस्वामी, डॉ मेघा वाकोडे, राजू देशमुख, सचिन पारधी, अतुल धाबेकर, शुभम पराळे, प्रणित कडू, निखील मेंढवाडे, मनोज डफरे, रफिक शेख, सुरफराज अली, अहमद खान, मोहसीन खान, दामोदर भेंडे, विशाल चौधरी आदि उपस्थित होते .

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com