स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.07) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्री }लॅट, लक्ष्मीनगर, नागपूर व मे. अष्टविनायक, जयप्रकाश नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओम इंडस्ट्रीस हल्दीराम, सिताबर्डी, नागपूर, यांच्यावर किचनमधील कचऱ्याद्वारे चेंबर ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. अल्फा सी.बी.एस.सी. पॉईंट, दाभा, नागपूर व मे. शालोम विद्या मंदिर, दाभा, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 10 हजार दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संजय किराणा स्टोर्स, मंडी, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मायरा स्टडी सेंटर, गिट़टीखदान रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. तसेच हॉटेल दिल्ली ग्रिल, सदर, छावणी, नागपूर यांच्यावर हॉटेलचा कचरा फूटपाथवर आढळला आणि किचनमधील चिमणी कार्यरत नसल्यामुळे कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाविप की आनलाईन भक्तीगीत संध्या राज्यस्तरिय स्पर्धा में पल्लवी प्रथम, सृष्टी दुसरे नंबरपर

Sat Jul 8 , 2023
नागपुर :-भारत विकास परिषद के दक्षिण – पश्चिम इकाई की ओर से आषाढी एकादशी निमित्त आयोजित ऑनलाईन भक्ति संध्या प्रतियोगिता पल्लवी नाकाडे ने पहले और सृष्टी पटवर्धननें दुसरे नंबर से जीत ली हैं. इस प्रतियोगिता का आयोजन 35 वर्ष से अधिक आयु के स्पर्धकों के लिये किया गया था. यह राज्यस्तरीय भक्तिगान प्रतियोगिता थी. प्रतियोगिता में न केवल महाराष्ट्र सें, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!