स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.3) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत पठान ले-आऊट, गायत्री नगर येथील गोयंका कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत न्यू डायमंड नगर, खरबी रोड येथील M/s Spark Academy यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिग लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कारचालकाने दुचाकीला दिली धड़क ; तिघे जख्मी

Thu May 4 , 2023
कन्हान :- कारचालकाने दुचाकी चालकाला धड़क दिली ज्यात तिघे जख्मी झाले असून सदर घटना बुधवार 3 मे 2023 ला सायंकाळी 5 : 00 वाजता दरम्यान नवीन कन्हान पुलावर घडली आहे नरेश खोब्रागडे ( वय 35 ),पत्नी पूजा नरेश खोब्रागड़े ( वय 31) व मुलगी निमीशा नरेश खोब्रागडे ( वय 07 ) तिघे रा. इंदिरा नगर कन्हान असे जख्मीची नावे आहेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!