नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.19) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत नाईक तलाव, तांडापेठ येथील अनुज सोनपापडी स्विटस या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मंगलवारी झोन अंतर्गत बोरगांव चौक येथील शिव कृपा डेअरी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत श्रेयस प्लेस, त्रिमुर्तीनगर येथील विघ्नहर्ता पॅथोलॉजी यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच दिनदयालनगर येथील Vedira Heights यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत कॉफी हाऊस चौक, धरमपेठ येथील वसिम शेख यांच्याविरुध्द हॉटेलचा कचरा रस्त्यालगत पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत साकेथ नगर येथील धनवंदरी मेटर्निटी सर्जिकल हॉस्पीटल यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आशिनगर झोन अंतर्गत लष्करीबाग येथील M/s Rompriri (Intergrated Infracom) यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.