स्वच्छ भारत अभियान : सीवर लाईन ब्लॉकेज, 75 हजारचा दंड वसुल

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.5) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 85 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.19, हज हाऊस जवळील, भालदारपूरा येथील रॉकेट अगरबत्ती या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.15, शंकरनगर चौक येथील M/s Haldiram, Karia Foods & Sons Pvt Ltd यांच्याविरुध्द सीवरेज लाईनला ‍किचन वेस्टेज लाईन जोडल्याबद्दल हरित लवाद कायदयानुसार कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत प्रभाग न. 20, तांडापेठ येथील M/s Johny Cloth Factory यांच्याविरुध्द कारखान्यातील कचरा आजुबाजुच्या परिसरात पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor felicitates participants of 'HindAyan' Cycling Expedition

Wed Apr 5 , 2023
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais felicitated the members of the Armed Forces who successfully completed the first ‘HindAyan Annual National Multi-Stage Cycling Race Cum Expedition’ at Raj Bhavan Mumbai on Wed (5 April). The Governor also felicitated the senior officers of the Government who supported the event. The Cycling Race and Expedition was organised between New Delhi and Pune by […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!