गुरू पौर्णिमेला ” गुरूपुजा ” गुणवंत विद्यार्थी, पत्रकार व मान्यवरांचा सत्कार संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– विकास हायस्कुल माजी विद्यार्थ्यीनी ८० वर्ष पार गुरूजीच्या गुरूपुजेने मार्मिक मंत्रमुग्ध. 

कन्हान :- गुरू पौर्णिमा सणाच्या मंगलसमयी माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे डोणेकर सभागृह कन्हान येथे गुरुवर्याची, गुरुजनांची गुरुपुजा करून उपस्थितांना भावनात्मक मंत्रमुग्ध करून शहरातील ४० गुणवंत विद्यार्थी, २० पत्रकार व मान्यवरांचा सत्कार करून स्नेह भोजन करून गुरूपुजा उत्सव थाटात संपन्न करण्यात आला आहे.

रविवार (दि.२१) जुलै २०२४ ला सायंकाळी ६ वाजता डोणेकर सभागृह मेन रोड कन्हान येथे माजी वर्गमित्र विद्यार्थी परिवार विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ व्दारे ” गुरू – शिष्यांचे अतुट नाते हिच महाराष्ट्राची उतुंगस्थानी असलेली पुरातन परंपरा. ” गुरु पौर्णिमा ” या मंगलसमयी विधीवत मॉ शारदाचे पुजन करून गुरुवर्य देशमुख , पोतदार , पोतदार, खर्चे , खर्चे, पटले, पटले, कोहळे, कोहळे, मालविये, अल्लडवार , धावडे , बारई, फरसोले, भोयर आदी गुरुजनांची माजी विद्यार्थ्या नी गुरुपुजन करून शुभ आशिर्वाद श्रवण करून कन्हान येथील ९ शाळा, ५ कनिष्ट महाविद्यालयातील इयत्ता १० वी, १२ वी च्या ४० गुणवंत विद्यार्थ्याचा स्मृती चिन्ह व पुष्प देऊन सत्कार केला. तसेच २० पत्रकार आणि डॉ. मंगतानी, डॉ जुनघरे, डॉ. योगेश जुनघरे, विकास प्राथमिक मु़ख्याध्यापक राजेंद्र खंडाईत , गीरजाशंकर यादव , कारेमोरे, शांताराम जळते, क्रिडा शिक्षक अमितसिंग ठाकुर, माधव काठोके, विजय पारधी, डोंगरे, पशीने , बेलनकर, डोंगरे, वंजारी, चौधरी, शरद डोणेकर, नरेश बर्वे, मधुकर नागपुरे आदी मान्यव रांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरानी आपआपले मनोगत व्यकत केले.

इयत्ता १ ते १० व्या वर्गापर्यंत बालवयापासुन वर थेट १६ वर्षात, ओल्या मातीला आकार देऊन जगण्याचा मुलमंत्र आमची शाळा विकास हायस्कुल कन्हान या पुज्यनिय विद्य्येच्या मंदीरात मिळाला. या प्रतिष्ठाणेत पुज्यनिय, वंद‌निय गुरुजनांनी आधुनिकते च्या स्पर्धेत यथायोग्य, यशस्वी नागरिक व चारित्र्याचे अनुष्ठान घडविले, जिवनाला आकार मिळाला. ते.. ते. .. आम्हीच….. हे आम्हचे भाग्यच. म्हणुनच २००५ पासुन सतत आम्ही गुरूपुजन करित असुन आता आम्ही वर्गमित्र, मैत्रीनी वयाच्या ६० वर्षाच्या उंबरठ्या वर उभे आहोत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतांना भविष्य जिवन पथावर वास्तव्याशी सामना करून यश संपादित करण्यास ८० वर्षाहुन अधिक वय गाठणा-या आम्हच्या गुरूजनाची गुरूपुजा करून या जन्मीचे सार्थक साधुन गुरूच्या आशिर्वादाने पुनश्च मंगलमय जिवनप्रवास सहजरित्या आम्ही साकारणार आहोत. अश्या मार्मिक ़शब्दात विकास हायस्कुलचे माजी विद्यार्थी प्रकाश जाधव हयानी मनोगत व्यकत करून उपस्थितांना भावनात्मक मार्मिक मंत्र मुग्ध केले. तंदनंतर वर्गमित्रानी गुरूजनाना बसवुन त्याचे हात धुऊन त्यांना भोजन वाढुन जेवनांतर परत हाथ धुऊन पुनश्च आशिर्वाद प्राप्त करित जिवनातील साठविलेल्या वर्गमित्राच्या आठवणी, भावना, ओलावा, सर्वस्वाचा अनंत ठेवा, म्हणुनच या सोहळ्यात गुरुजना चे या जन्मीचे ” गुरूतिर्थच ” संपांदित केले.

विकास हायस्कुल कन्हान बॅच १९८०-८१ चे माजी वर्गमित्र विद्यार्थी माजी खासदार प्रकाश जाधव, विजय डोणेकर, कमलेश पांजरे, हाजी शेरू शेख, अशोक पोटभरे, प्रदीप वानखेडे, शंकर राऊत, प्रेम रोडेकर, गोविंद जुनघरे, दिलीप येलमुले, देवानंद साकोरे, राजेंद्र गोरले, नथ्थुजी लंगडे, जिवन लिल्हारे, उमराव पाटील, प्रभाकर ताजणे, मुकेश घोटेकर, मोरे श्वर ऊके, नंदा काकडे, चंपा गजभिये, माधुरी माटे, लता वंजारी, आशा वानखेडे सह वर्गमित्र, मैत्रीनी आदीनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास मोतीराम रहाटे, कमल यादव, गणेश भोंगाडे, नितीन रावेकर, संजय शेंदरे, शेषराव बावने, प्रतिक जाधव, पारस आदिनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Cyber police and Sonegaon police slapped for not complying with Nagpur bench's orders..

Mon Jul 22 , 2024
Nagpur: Police Department is not following orders of Nagpur bench of Bombay High Court and compelling complainants to go to Magistrate and bring order for further investigation in Non-cognizable cases instead of getting orders from Magistrate and conducting investigation. It has come to fore from an order passed in a Criminal Writ Petition. Hearing Criminal Writ Petition No- 544 of […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!