नागपूर :- डॉ. पंजाबराव देशमुख जयंती समारोहानिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये सोमलवार हायस्कूल, खामला शाखेतील एकूण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक – राधा बगेकर, द्वितीय क्रमांक – साहिती भोगराजू तसेच प्रोत्साहनपर बक्षिस – श्रावणी ठाकरे या दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक – सावली नावलेकर, तृतीय क्रमांक – लक्ष्मी सरप तसेच भाषण स्पर्धेत तृतीय क्रमांक – अंश पाटील व प्रोत्साहनपर – रुढ्र कडुकर व यशश्री मौदेकर यांनी बक्षिसे प्राप्त केलीत. या सर्व विजयी विद्यार्थ्यांना आयोजकांमार्फत बक्षिस समारंभात स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र तसेच रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या उत्सफूर्त सहभागाबद्दल शाळेलाही स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका वैशाली खरतडकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचाही शाल देऊन आयोजकांमार्फत सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी तसेच विजयी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका यांचे शाळेचे मुख्याध्यापक योगेश गोन्नाडे व उपमुख्याध्यापक पांडे तसेच सकाळ विभाग प्रमुख तांबे यांनी अभिनंदन केले. संस्थेचे सचिव पी.पी.सोमलवार यांनी सर्वांना मिळालेल्या या यशाचे कौतुक व अभिनंदन केले.
सोमलवार हायस्कूल खामला शाखेचे सुयश
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com