स्मार्ट प्रसाधनगृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) महिन्याभरात सादर करा

– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चौधरी यांचे स्लम विभागाला निर्देश

नागपूर :- नागपूर शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा उंचाविण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर महानगरपालिका कार्य करीत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक व गर्दीच्या ठिकाणी शहरात स्मार्ट पब्लिक टॉयलेट तयार करण्यात येणार असून, या स्मार्ट प्रसाधनगृहांचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या महिन्याभरात सादर करावा असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्लम विभागाला दिले आहेत.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आयुक्त सभा कक्षात सोमवारी (ता १८) रोजी स्मार्ट पब्लिक टॉयलेट संदर्भात बैठक झाली. याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता कमलेश चौहान, विजय गुरुबक्षाणी, उपअभियंता डी.एम. भोवते, कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी, अरुण पेठेवार, सुलभ इंटरनॅशनलचे रामनरेश झा. वास्तुविशारद सुधाकर किणी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या सोयीसाठी मनपाच्या दहाही झोन निहाय जवळपास ६८ प्रसाधनगृहे आहेत. यातील तीन प्रसाधनगृहे ही स्मार्ट पब्लिक टॉयलेट आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात आणखी ३२ स्मार्ट पब्लिक टॉयलेट तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या महिन्याभरात सदर करावा असे निर्देश डॉ. चौधरी यांनी दिले. शहरातील विविध परिसरात आणि वर्दळीच्या ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या स्मार्ट पब्लिक टॉयलेट मध्ये आवश्यकतेनुसार, स्तनदा मातांसाठी वातानुकूलित हिरकणी कक्ष, दिव्यांगांसाठी व्हिल चेअर सुविधा करण्यात यावी असे निर्देश डॉ. चौधरी यांनी दिले.

NewsToday24x7

Next Post

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

Tue Sep 19 , 2023
– “सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे मुंबई :– गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com