नागपूर :- संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती ऑल इंडिया पॅंथर सेना, ऑटो चालक-मालक संघटना व टेलिफोन नगर दुकानदार संघटनेच्या वतीने संयुक्तरीत्या दिघोरी चौकात साजरी करण्यात आली. या प्रसंगी बसपा नेते उत्तम शेवडे, सामाजिक कार्यकर्ते विकास वासे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी प्रबोधनकार वीरेंद्र बोरडे यांच्या बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम करण्यात आला. सर्वसामान्यांना हक्क व अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाच्या रक्षणाकरता सर्वसामान्य नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन उत्तम शेवडे ह्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गजभिये यांनी तर समारोप डॉ महेश अंबादे यांनी केला. संजय पाटील, शेखर वंजारी, विजय बोरकर, जनार्दन साळवे, अवनी नाईक आदिंनी विशेष परिश्रम घेतले.