नागपूर :- सामाजिक न्याय विभागाने जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला आज लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. वसतीगृहाच्या मुलांपासून तर तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर साऱ्याच घटकातील दुर्गम भागातील लाभार्थ्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
लाभाच्या विविध योजनांसाठीचे स्टॉल, योजनांची माहिती देणारे स्टॉल, आकर्षकरित्या सजविण्यात आलेले सभागृह, यामुळे या कार्यक्रमाची भव्यता सगळ्यांच्या लक्षात राहिली. संविधानाच्या प्रस्तावनेने व महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने झालेली सुरुवात आकर्षक होती.
समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या १७ योजनांच्या २००० लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात लाभ वाटप करणारा राज्यातील हा वेगळा सोहळा लक्षणीय ठरला.
“शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत शासनाद्वारे समाजातील वंचित घटकांच्या कल्याणाकरिता चालविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता खूप मोलाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शासनाच्या या अभियानाला पुढे नेण्याचे काम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. याद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील ज्या घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचू शकत नव्हत्या अशा लोकांना या योजनेचा लाभ देण्याचे काम समाज कल्याण विभाग करत आहे.
या योजनांमध्ये मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावनेर येथील नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण दुरदृश्यप्रणाली द्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तसेच समाजकल्याण विभागाद्वारे सदर कायक्रमात वंचीत घटकातील मांग, मातंग, सफाई कर्मचारी, मांग गारोडी समाजातील लोकांना रमाई आवास योजनेतून घरकुल वाटप करण्यात करण्यात आले . नागपूर जिल्हयातील संपूर्ण वसतीगृह व निवासी शाळा याना जोडणा-या सीसीटिव्ही युनीटचे उद्घाटन दुरदृष्यप्राणालीद्वारे करण्यात आले. कन्यादान योजनेअंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेवून विवाह करणा-या लाभार्थ्यांना धनादेश वाटप, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप, स्टॅन्ड अप इंडिया योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाळ सबळीकरण व स्वाभिमान योजनेनुसार ७/१२ व प्रमाणपत्र वाटप, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप, दिव्यांगाना साहित्य वाटप, टच स्क्रीन स्टॅन्डीचे विविध विभागांना हस्तांतरण करण्यात आले.
यावेळी एका भावनिक प्रसंगाला देखील सभागृहाने बघितले. नागपूर शहरातील गटर लाईन साफ करतानामृत पावलेल्या चार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना या वेळी धनादेश वाटप करण्यात आले.
शासकीय वसतीगृहे व निवासी शाळेला सॅनेटरी नॅपकीन डिस्टॉय मशिनचे वाटप, शासकीय वसतीगृहातून प्रथम आलेल्या गुणवन्त विद्यार्थ्यांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला.
समाज कल्याण विभागाच्या मार्फत मांग, मातंग, सफाई कामगार यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन योजनांच्या लाभ पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. वंचित घटकातील लोकांजवळ कागदपत्रांची कमतरता असल्यामुळे लोकांना शासनाद्वारे राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होतात. या अडचणी दूर करण्याचे काम समाज कल्याण विभागाकडून करण्यात येत आहे. अशा अनेक लाभार्थ्यांची सभागृहातील उपस्थिती लक्षवेधी होती.
यावेळी रमाई आवास घरकुल योजनेतून सरिता लोखंडे,आशा कावडे, शशिकला लोंढे, बाळा इंगोले, शिलाबाई तायवाडे,बाळाजी ठोसर,प्रदीप दुबे,शोभा कांबळे, विलास वानखेडे, मंगला मानकर, ईश्वर नाडे, शालिकराम हातागडे, सुनिता उफाडे, रोशन हातागडे, रामसिंग लोंढे, जितेंद्र लोंढे, मंगल लोंढे, मंगलसिंग लोंढे यांना लाभ देण्यात आला.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेतून मंदा लाभदरे, पूजा लांडगे, उमेश गायकवाड, छाया मेश्राम, पुरुषोत्तम मेश्राम, धनसिंग देवगुणे, जगदीश ढोणे, प्रकाश बागडे, राजेंद्र सोमकुवर, विनायक रक्षित, सरिता लोखंडे, कैलास बागडे, आशा कावडे, शशिकला लोंढे, बाळा इंगोले, शिल्पा तायवाडे, प्रदीप ढोणे, बाळाजी ठोसर, सीमा मडके, वनिता सहारे, सुगंधा सोनेकर,
मार्जिन मनीचे लाभार्थी : स्नेहा मेश्राम, वर्षा संजय जांभुळकर यांना लाभ देण्यात आला.
उत्कृष्ट महिला गृहपाल व पुरुष गृहपालअनुक्रमे प्रतीक्षा मोहने, किशोर रहाटे यांना पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी युडीआयडी कार्डचे वाटप सचिन मेश्राम, अदिती येरवारकर,श्रेया गुप्ता,कावेरी खिरडकर, गौरव जाधवंशी यांना करण्यात आले.
महात्मा फुले महामंडळ : वनमाला बोरकर, बबीता अविनाश भोंगे, मुन्नी राणे, स्वाभार योजना, पंकज रामटेके, मयुरी बागडे, श्रीकांत कुचुमवार, शैलेश ढोके,
कन्यादान योजना: शीला घोरपडे, प्रभा वाघमारे, भुवन रगडे, हरिदास पाटील, मंगला भीमराव खंडेजोड
प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना :
ग्रामपंचायत धूरखेडा, वेलसारखा, अंबोली, रामपुरी, सिल्लोरी, खैरी, चिखली, सावंगी, हरदोली, कांद्री
यशवंतराव चव्हाण मुक्त वसतीगृह योजना: शंकरराव सुरतकर, विजय सुरतकर, दशरथ जगताप, लताबाई शिंदे, विलास सुरतकर यांना लाभ देण्यात आला.
दिव्यांग लाभार्थी: जान्हवी वाघमारे -श्रवण यंत्र, सुमित गोपनारायण- स्मार्टफोन, जानवी तांडेकर, प्रज्वल अंबाडरे, जान्हवी उरकुटे, गिरीश कुकडे, प्रतिभा तीरकुले – वॉकर, तन्मय रामगिरवार, स्पर्श टेकाडे यांना साहित्य वाटप करण्यात आले.
कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या महिला सफाई कामगारांचे वारसदार लाभार्थी: सीता वाल्मीक, मायादेवी वाल्मीक, पुष्पा संजय वसादे यांना सानुग्रह निधी देण्यात आला.
मिनी ट्रॅक्टर लाभार्थी: साने महिला बचत गट, गायत्री महिला बचत गट , रमाई महिला बचत गट यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
काही वाटप प्रतिनिधिक स्वरूपाचे होते. तर काही सामूहिक स्वरूपाचे होते त्यामुळे मोठ्या संख्येने नागपूर जिल्ह्यातील व महानगरातील नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.