चंद्रपूर :- येत्या 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे तसेच रविवार असल्याने होणारी संभाव्य गर्दी पाहता दर रविवारला भरणारे संडे मार्केट हे बंद ठेवण्यात येणार आहे.
मनपा हद्दीतील न्यु इंग्लीश शाळेसमोर तसेच जयंत टॉकीज जवळ मुख्य रस्ता ते झाडे हॉस्पीटल चौक या रस्त्यावर दर रविवारला संडे मार्केट या नावाने बाजार भरतो. यात विविध तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने, हातठेले,फेरीवाल्यांची दुकाने लावण्यात येतात. या दुकानांमुळे रविवारी या परिसरात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
6 एप्रिल रविवार रोजी श्रीरामनवमी सणानिमित्त भाविकांद्वारे भव्य शोभायात्रा काढण्यात येते असल्याने सदर भागातील पुर्व-पश्चिम बाजुला नागरीकांची वर्दळ वाढून काही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाद्वारे देण्यात आले आहे.