सुमतीताईंनी प्रतिकूल काळात संघटनेचे काम केले – केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी

– बालजगतमधील कार्यकर्ता दिनाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा

नागपूर :- सुमती सुकळीकर यांनी अतिशय प्रतिकूल काळात विचारधारेशी प्रामाणिक राहून संघटनेचे कार्य केले. कौटुंबिक, सामाजिक व राजकीय जीवनात त्यांना बरीच किंमत चुकवावी लागली. मात्र, आपण देशाच्या व समाजाच्या कल्याणासाठी काम करोय, अशी त्यांची भावना होती, या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी लोकमाता सुमती सुकळीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

दीनदयाल शोध संस्थान, बालजगत व ताई सुकळीकर सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमाता सुमती सुकळीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त कार्यकर्ता दिन आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. नितीन गडकरी बोलत होते. बालजगत येथे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे अध्यक्षस्थानी होते. तर सुमतीताईंच्या कन्या व कुटुंब न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडक्कार, प्रसिद्ध उद्योजक प्रभाकरराव मुंडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे व शालीनी खरे यांचा सत्कार करण्यात आला. ‘सुमतीताईंनी भारतीय जनसंघाचा विचार पुढे नेला. अतिशय संघर्षातून सामाजिक व राजकीय कार्य केले. या कामात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण संकटांची चिंता न करता त्यांनी संघर्ष केला,’ असेही ना. गडकरी म्हणाले. कार्यक्रमाला सुधा सोहनी, डॉ. उदय बोधनकर, ज्येष्ठ विधिज्ञ आनंद परचुरे, विनय देशपांडे, संजय बंगाले, दिलीप दिवे, प्रमोद तभाने, नरकेसरी प्रकाशन लि.चे प्रबंध संचालक धनंयज बापट आदींची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी वाहतूक मार्गात बदल

Mon Feb 26 , 2024
यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता यादिवशी सकाळी ८ ते रात्री १० वाजता दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास दोन ते तीन लाख महिला व कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने भारी विमानतळ ते कार्यक्रमस्थळ या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com