संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम रहिवासी व मागील दहा वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र मधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा राहत्या घरातच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव हरिदास चांदेकर वय 70 वर्षे रा कामठी असे आहे.मृत्यूचे कारण कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे सांगण्यात येते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलवीत मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाच्या कुटुंबात दोन मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.