संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौक रहिवासी एका तरुणाचा बेशुद्ध होऊन खाली पडल्याने अकस्मात मृत्यु झाल्याची घटना परवा सायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव सुहास भसारकर वय 41 वर्षे रा दुर्गा चौक कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतकाचे आई वडील यापूर्वीच देहावसान झाल्याने मृतक हा एकल जीवन जगत होता.परवा दुपारी 1 दरम्यान दुर्गा चौकातील एका मंदिराजवळ सदर तरुण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडल्याने त्याला उपचारार्थ नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले मात्र तोवर डॉक्टरने तपासून मृत घोषित केले.मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे