संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– मुख्याधिकारी – संदीप बोरकर ची यशस्वी कामगिरी
कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे.मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियानाच्या शहरात कामठी नगर परिषद च्या वतीने विविध उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तसेच माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात लोकसहभागावर विशेष भर दिला जात आहे.आणि या उपक्रमात सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
कामठी शहरात १,२०० चौ.मी. नविन हरित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या नवीन हरित क्षेत्राला “गायत्री स्वास्थ उपवन” म्हणून संबोधले जाते. हा योग उपवन प्रकार आहे, ज्यामध्ये विविध स्थानिक देशी वनस्पती लावल्या जातात आणि योग करण्यासाठी जागा तयार केली जाते. कामठी नगरपरिषदेने या उपवनात ‘रिफ्लेक्सोलॉजी फूट पाथ’ तयार करून अनोखा उपक्रम राबविला आहे, म्हणून त्याला “स्वस्थ उपवन” असे संबोधले. गायत्री स्वास्थ उपवन हे देशी वनस्पतींनी परिपूर्ण आहे, जे हवेतील प्रदूषण पातळी कमी करण्यास आणि वायू प्रदूषणाचा पर्यावरणावरील परिणाम पूर्णपणे कमी करण्यास मदत करते. शहरातील नगरपरिषद कार्यालय प्रांगण, नवीन मोक्षधाम कामठी, राणी तलाव व शहरातील विविध प्रभागात ५,००० पेक्षा अधिक वृक्षारोपण करण्यात आले आहे.नगर परिषद कार्यालयात ‘अमृत वाटिका’ हि संकल्पना राबविण्यात आली आहे. जुने आणि नवीन हरित क्षेत्र देखभाल करण्याकरिता सदर क्षेत्र हरित क्षेत्र घोषित करून स्थानिक समिती तयार करून समिती मार्फत त्यांची देखभाल केली जाते. संकलित व विलंगीकृत कचऱ्याची टक्केवारी शहरात १००% टक्के असून नगरपरिषदमार्फत ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्यात येत आहे. सदर खत नगरपरिषदेच्या मार्फत रु. २ इतक्या माफक दराने प्रती किलो प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. नगर परिषद कामठी मार्फत दररोज १६ घंटागाडी १६ प्रभागातील विलागीकृत कचरा गोळा करतो. सुका कचरा व्यवस्थापन करण्याकरिता एम आर एफ सेंटर तयार करण्यात आले आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करिता प्लास्टरुट कंपनी मार्फत शहरातील प्लास्टिकचे व्यवस्थापन केले जाते. तसेच महिला बचत गट प्लास्टिक पासून घरातील शोभिवंत वस्तू बनवून प्लास्टिक कमी करतात. एकल वापर प्लास्टिक (एसयूपी) बंदी करिता शहरात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. नगर परिषद प्लास्टिक बंदी पथकामार्फत व प्लास्टिक बंदी व्यवस्थापन कक्षा मार्फत प्लास्टिक वापणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जैव-वैद्यकीय कचरा अधिकृत कंत्राटदार मार्फत व्यवस्थापन केले जाते. नगर परिषद कामठी येथील जल शुद्धीकरण केंद्र, कामठी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहाय्याने हवा गुणवत्ता तपासणी केंद्र उभारण्यात आले असुन, हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जात आहे. नगरपरिषद मार्फत कुंभारे कॉलोनी,ड्रॅगन पॅलेस रोड वर 6 किमी लांबीचा सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. राडाराडो कचरेचे (C&D) संकलन करण्याकरिता न.प. कामठीकडे ४ ट्रक्टर असुन, सर्वे क्र. २९ येथे राडाराडो कचरेचे (C&D) चे व्यवस्थापन केले जाते. रस्ते बांधकामासाठी आणि बांधकाम परवाना देताना सबंधित राडा रोड्याचा वापर करण्यास सक्ती करण्यात आली आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहन धोरण- २०२१ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे व नगरपरिषद कामठी मार्फत इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशनची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नगरपरिषद कामठी मार्फत घरो-घराचा विलागीकृत कचरा संकलाना करिता ५ ई- रिक्षा खरेदी करण्यात आली आहे. नागरिकांमधील चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात सायकलिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे, तसेच शहरात बाजाराचा शुक्रवार हा दिवस “नो वेहीकॅल डे” म्हणून पाळण्यात येत आहे. अमृत २.० अंतर्गत शहरातील राणी तलाव परिसरातील राखीव जागेचे सौंदर्यीकरण करणे करिता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर)तयार करण्यात आला आहे.शहरातील १००% शासकीय इमारतींचे पाणी लेखापरीक्षण करण्यात आले असून त्यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. शहर पाणी पुरवठा योजनेचे पाणी लेखा परीक्षण प्रस्तावित आहे. शहरात यावर्षी एकूण २२ ठिकाणी नवीन शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. शहरात बांधकाम परवाना देताना रेन वॉटर हारवेस्टिंगची प्रणाली आणि शोषखड्डे बांधण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.शहरातील विहिरींची दर महिन्यातून एकदा स्वच्छता केली जाते. तसेच त्यांच्या भोवताली सुशोभीकरण करण्यात आले आहे.शहरातील नाल्यावर इको-फ्रेन्डली बंधारा बांधण्यात आला असून सदर बंधाऱ्यामार्फत शुद्ध केलेल्या पाण्याचे नमुने तपासणी करून, कमीत कमी खर्चामध्ये पाण्याचे शुद्धीकरण करून सदर पाणी वृक्षलागवडी करिता वापरण्यात येत आहे. कामठी शहरातुन विविध वार्डातुन निघणारे सांडपाणी प्रक्रिया करण्याकरिता शहरातील अजनी रोड कामठी येथे 500 KLD FBR यंत्रणेवर आधारित विकेंद्रीकरण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Decentralize STP) उभारणी करणे सुरु आहे. तसेच भाजी मंडी, वार्ड नं. 1 मध्ये MBR यंत्रणेवर आधारित विकेंद्रीकरण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Decentralize STP) उभारणी करणे सुरु आहे. शहरात मुख्य सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणी करणे करिता लागणारी जागा अधिग्रहण करणे तसेच त्याबाबतची संपुर्ण प्रक्रिया करण्याचे कार्य सुरु आहे. त्याव्दारे एकुण १६ MLD संपुर्ण शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे अंदाजपत्रक तयार करणे सुरु आहे.पर्यवरणपूरक विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे प्रोत्साहन देण्यासाठी शहरामध्ये एकूण १२ कृत्रिम विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली आहे.नगरपरिषद मार्फत पर्यावरणपूरक घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात माझी वसुंधरा अभियांची जनजागृती करण्याकरिता दर्शनीय ठिकाणी प्रमोल्गेशन स्पॉट तयार करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी वॉल पेंटिंग करून अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे. अक्षय उर्जा स्त्रोतांचा वापरास प्रोत्साहन देण्याकरिता ‘No Vehicle Day’ पाळण्यात येत आहे, व सायकल ऱ्यालीचे आयोजन करून जागरूकता निर्माण केली गेली आहे. शहरात खाजगी/सार्वजनिक अशा एकूण १२ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प आस्थापित केले आहेत. आत्तापर्यंत एकूण १००% इमारतींचे उर्जा परीक्षण करण्यात आले असून त्या अनुषंगाने उर्जा बचतीकरिता प्रयत्न केलेले आहेत.
माझी वसुंधरा ४.० अभियान अंतर्गत पोर्टलवर वैयक्तिक १२२ व सामुहीक ६० ई- शपथ घेण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घेतलेल्या ई- प्लेज ची त्यांच्या द्वारे पूर्तता करण्यात येतआहे. माझी वसुंधरा ४.० अभियान अंतर्गत स्थानिक संस्था, NGO, शैक्षणिक संस्था तसेच RWA यांच्या मार्फत विविध उपक्रम राबविण्यात आली आहेत. यांच्या सहकार्याने आतापर्यंत १७ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या मार्फत माझी वसुंधरा अभियानाची प्रसिद्धी करण्याच्या हेतूने विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच एकूण २०८ पर्यावरण दूत यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर्षी पर्यावरण दुत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगर परिषद कामठी शहरात ३०% लोकांच्या घरी नागरिकांमार्फत वृक्षारोपण केलेले आहे, तसेच प्रत्येक कार्यालयामध्ये व शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.