केळवद :- आगामी लोकसभा निवडणुक या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे करीता तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या करीता सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारू काढणारे लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने दि. ०२/०३/२०२४ रोजीचे सकाळी ०५.३० वा. चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर (ग्रा) येथील पोलीस पथके खाजगी तसेच शासकीय वाहनाने सावनेर उपविभागातील पोस्टे केळवद हददीतील मौजा तिडंगी पारडी वेडा येथे मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्याकरीता गेले, नमुद घटनास्थळी स्टॉफसह रेड केला असता अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०५ महिला आरोपी व ०१ पुरूष आरोपी नामे अमित चंद्रपाल राजपूत, वय ३४ वर्ष, रा. तिडंगी पारडी बेडा हे मोहाफुल रसायन सडवा बाळगुन गावठी पद्धतीने भट्टी लावुन मोहाफुलाची गावठी दारू गाळतांना मिळुन आले. आरोपींचे ताब्यातून एकुण मोहाफुल रसायण सड़वा ८१४० लिटर किंमती १,६२,८००/-रु. व मोहाफुल गावठी दारु ९० लिटर किंमती ४५००/- रु व दारु गाळण्याचे साहीत्य निळया प्लास्टिक इम, लोखंडी इम, जळाऊ लाकुड, रबर पाईप, जर्मन पमिले, स्टील झाकणी किंमती ५८१००/- रु असा एकुण किंमतीं २,२५४००/-रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपी विरुद्ध पो. स्टे केळवद येथे कलम ६५ (बी) (सी) (ई) (एफ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनीयम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, दिपक काँक्रेटवार, पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, सहायक फौजदार बंद्रशेखर गडेकर, नाना राउत, प्रमोद तभाने, सुरज परमार, पोलीस हवालदार आशिष मुंगळे, राजेंद्र रेवतकर, रोशन काळे, किशोर वानखेडे, मिलींद नंदुरकर, उमेश फुलबेल, चालक पोहवा अमोल कुथे, शंकर मडावी, रोहन डाखोरे, नितेश पिपरोदे, दिनेश अधापुरे, गजेंद्र चौधरी, संजय बांते, इकबाल शेख, पोहवा चालक मोनु शुक्ला, मपोहवा नम्रता बघेल, कविता बनले, नापोशि विरेंद्र नरड, पोना अमृत किनगे, विपीन गायधने, मनापोशि वनिता शेंडे, पोलीस अंमलदार निलेश इंगुलकर, अभिषेक देशमुख, राकेश तालेवार यांनी पार पाडली.