नागपूर :-पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पंचवटी नगर, प्लॉट नं. २४७, यशोधरानगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे रमेश महादेवराव कांबळे वय ४४ वर्ष हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह दवाखान्यात गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून रोख ९५,०००/- रू. चोरून नेले. फिर्यादी यांचे तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात यशोधरानगर पोलीसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून आरोपी क. १) शेख आरीफ शेख शाकीर, वय २५ वर्ष, रा. पंचवटी नगर, यशोधरानगर, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथिदार आरोपी क. २) प्रमोद उर्फ शुभम राजेश समुद्रे. वय ३० वर्ष, रा. निर्मल नगर, विद्या सोसायटी, मानकापूर, नागपूर याचे सोबत संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपींना अधिक विचारपूस करून सखोल चौकशी केली असता, आरोपींनी यागुन्हया व्यतीरीक्त पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत-०१, कपिलनगर-०१, कळमणा-०१ असे एकुण ०४ ठिकाणी वाहन चोरी व घरफोडी केल्याचे सांगीतले. आरोपींचे ताब्यातुन रोख १३,२७०/-रू., एक एल.ए.डी टि.व्ही, एक अॅक्टीव्हा गाडी, असा एकुण किंमती अंदाजे ५८,२७०/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरील कामगिरी मा. श्री. रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपूर शहर, निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क. ५), सत्यवीर बंडीवार, सहा. पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. रमेश खुणे, दुपोनि, सुहास राऊत, सपोनि, विलास पाटील, पोहवा. राहुल बोन्द्रे नापोअं. अशोक तायडे, पोअं. संदीप वानखेडे, मनिष झरकर, सतिश चौरसिया, प्रितम ठाकुर यांनी केली.