– वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, मांगली, कोलामपूर, पिजदुरा, पाचगांव, मोवाडा, काटेबाळा, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप
वरोरा :- शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही तर देशाचे भवितव्य घडवत असतो. म्हणून शिक्षकाचे स्थान सर्वोच्च आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रगतशील रहावे स्वतः बरोबर समाज तसेच राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय ठेवावे, असे मत सामाजिक कार्यकर्ते बंडू खारकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या मार्गदर्शनात वरोरा तालुक्यातील टेमुर्डा, खांबाडा, मांगली, कोलामपूर, पिजदुरा, पाचगांव, मोवाडा, काटेबाळा, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये बुक व साहित्य वाटप करण्यात आले.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक विकास दडमल, शिक्षिका माया चतुर, शिक्षिका मुत्यालवार, शिक्षक विधाय धवणे, कमलाकर पाकमोडे, यांची तर टेमुर्डा येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश विरूटकर, मुख्याध्यापक तानेश पावडे, अगलवार, बोटरे , गराटे , चिंचोलकर, शिक्षिका विरूटकर यांची टेमुर्डा येथील राजीव गांधी विद्यालयात मुख्याधापक एन. एम. बोबडे, शिक्षक पेटकर , खिरटकर, पाथोडे , खांबाडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत खांबाडा ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश शेरकी, मुख्याध्यापक व्ही. डी. पडवे, शिक्षिका बेले, गोगल , खांबाडा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश शेरकी गुरुजी, प्राचार्य आर. डी. पारोथे, शिक्षक एन. एम. धोटे, एन. के. खिरटकर, मांगली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक दत्तू भुसारी, शिक्षिका अनिता टोंगे, कोलामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका माधुरी काळे, पिजदुरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकसह शिक्षिका व शिक्षक, पाचगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका मंगला शेंद्रे, शिक्षिका अर्चना ढवस, नितीन शास्त्रकार, मोवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक सुधीर कुंभारे, शिक्षक शैलेंद्र शेरकुरे,
काटेबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक निखिल ठमके, शिक्षिका निराशा लांडे, भटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका भारती बावनकर, आवडे , ढवस , काळे, बंसोड, शिक्षिका पचारे , ढेंगळे आदींची यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
सर्व शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते बंडू खारकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.