जि.प.शाळांतील विद्यार्थी सुद्धा विभाग,राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार

– डॉ.पंकज भोयर राज्यमंत्र्यांचे भाजप शिक्षक आघाडीला आश्वासन

नागपूर :- राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक सुप्त क्रीडा गुण असून सुद्धा त्यांना तालुका व जिल्हा पातळीवरच खेळण्याची संधी मिळते. पुढे त्यांना विभाग व राज्य पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये खेळायला मिळतच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडातील सुप्त कला गुणांना वाव मिळत नाही. या गंभीर विषयाची दखल घेत अनिल शिवणकर , अध्यक्ष पूर्व विदर्भ भाजप शिक्षक आघाडी यांच्या नेतृत्वात मा.ना डॉ.पंकज जी भोयर राज्यमंत्री शालेय शिक्षण यांच्यासोबत बैठक संपन्न झाली.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास ६५ हजार शाळांमध्ये ५० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यातील बहुतांश प्राथमिक शाळा विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील ह्या वर्ग १ ते ७/८ वी पर्यंत आहे. त्यामुळे त्या शाळेतील शिकणारे विद्यार्थी हे वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत याच शाळेत शिक्षण घेतात.

शालेय विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना चालना मिळावी यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी राज्यात खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद स्तरावर करण्यात येते. परंतु सदर स्पर्धा ह्या तालुका व जिल्हा स्तरावरच घेण्यात येतात त्यामुळे या शाळांमधील खेळडूंना जिल्ह्याबाहेर म्हणजेच विभाग,राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर आपले कौशल्य सिद्ध करता येत नाही तसेच शासनाच्या क्रीडा धोरणाचा फायदाही त्यांना होत नाही.

परंतु महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय खेळ महासंघाशी संलग्नित शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असते यामध्ये तालुका , जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर या स्पर्धा पार पडतात ऑलम्पिक महासंघाने ठरवून दिलेल्या सर्वच खेळांचा समावेश यामध्ये करण्यात येतो. सर्व माध्यमांच्या खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कॉन्व्हेंट शाळांमधील विद्यार्थी यामध्ये भाग घेतात व आपले कौशल्य सिद्ध करतात.

शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या व राज्याचे क्रिडा विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी मात्र भाग घेऊ शकत नाहीत त्यामुळे ते त्यांच्या अंगी कौशल्य असूनही ते सिद्ध करू शकत नाहीत. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षण घेत असलेल्या वाडी, वस्तीवरील गोरगरिबांच्या मुलांना उत्तम खेळाच्या संधी मिळाव्यात असा युक्तिवाद अनिल शिवणकर यांनी मंत्री महोदयांना केला , याकरिता राष्ट्रीय खेळ महासंघ संलग्न व क्रीडा विभागाचे वतीने घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात यावे अशी अशी मागणी केली त्यावर माननीय मंत्री महोदयांनी हा विषय फारच चांगला असून नक्कीच या विद्यार्थ्यांना राज्य विभाग व राष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या संधी देण्याचा प्रयत्न करू अशी आश्वासित सभेला केले. प्रसंगी सुनील गफाट, अध्यक्ष भाजप वर्धा, अनिल शिवणकर, डॉ. उल्हास फडके ,शेषराव बिजवार, संदीप उरकुडे, पुष्पराज मेश्राम ,ओंकार श्रीखंडे, प्रदीप बिबटे, कैलाश कुरंजेकर,विनोद नाकाडे,सरताज पठाण, योगेश धाडसे, गौरव दातीर, ललित धार्मिक, सुनिल शंभरकर, दिवाकर बेहरे, सचिन टरके, संध्या पायले, स्नेहा निचत, सचिन खोडके, विनोद धोबे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजाणी करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Jan 28 , 2025
– पुढील १०० दिवसांमध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा मुंबई :- राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा प्रश्न असून दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक आहे. त्यामुळे दुध भेसळीस आळा घालण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजाणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!