विद्यार्थी युवक, एस.आर. स्पोर्टिंगला विजेतेपद – खासदार क्रीडा महोत्सव लंगडी स्पर्धा

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लंगडी स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला गटात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ आणि एस.आर. स्पोर्टिंग क्लबने विजेतेपद पटकाविले. भांडे प्लॉट बापू नगर येथे ही स्पर्धा पार पडली.

पुरुष गटात विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ संघाचा अंतिम सामना नेहरु क्रीडा मंडळ संघासोबत झाला. सामन्यात ११ गुणांनी विजय नोंदवून विद्यार्थी युवक क्रीडा मंडळाने जेतेपदावर मोहोर उमटविली. महिला गटात नेहरु क्रीडा मंडळ संघाचा ३ गुणांनी पराभव करुन एस.आर. स्पोर्टिंग क्लबने विजेतेपद पटकाविले. पुरुष गटात विद्यार्थी युवक संघाचा मनोज गोटेकर, नेहरु क्रीडा मंडळचा सुमीत हलबे आणि इंदिरा गांधी महाविद्यालयाचा राकेश नायक हे तिघे उत्कृष्ट खेळाडू ठरले. महिला गटात एस.आर. स्पोर्टिंगची मिनल मेश्राम, नेहरु क्रीडा मंडळची चित्रा मनपती, सेंट झेव्हियर्स सकूलची नितेश्री गिरी या तिघी उत्कृष्ट खेळाडू ठरल्या.

१४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतीत नूतन भारत विद्यालयाचा १२ गुणांनी पराभव करुन अमित हायरप्रायमरी संघाने विजय मिळविला. मुलींमध्ये जीआरएस वानाडोंगरी स्कूलने अमित स्पोर्ट्स ॲकेडमीचा अवघ्या एका गुणाने पराभव करुन जेतेपद प्राप्त केले. नेहरु क्रीडाचा हिमांशू मेश्राम, नूतन भारतचा हिमांशू बावणे आणि अमित हायस्कूलचा प्रतिक मलीक मुलांमध्ये तर जीआरएसची वेदिका चव्हाण, अमित स्पोर्ट्सची तमन्ना यादव आणि अमित इंग्लिश स्कूलची रिया झाडे हे उत्कृष्ट खेळाडू ठरले.

आमदार मोहन मते यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका दिव्या धुरडे, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक संदेश खरे, रवी निमसरकर, ऋषिकेश बागडे, विवेक शाहू, प्रमोद कडूकर आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Operation Amanat: RPF Nagpur Safely Returns Lost Belongings to Passenger

Thu Jan 30 , 2025
Nagpur :- Under the ongoing initiative “Operation Amanat,” the Railway Protection Force (RPF), Nagpur, successfully returned a passenger’s forgotten belongings. A green jacket left behind on Train No. 12262 was retrieved and returned to its rightful owner after due verification. On January 20, 2025, the Divisional Security Control Room (DSCR), Nagpur, received a report about a green jacket left in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!