दुखापत करणारा आरोपी ताब्यात

नागपूर :- दिनांक ०९.०३.२०२४ चे ०९.३० वा. च्या सुमारास पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत, लॉट नं. १२२, शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी दानीश आलम मेहबुब आलम, वय ३७ वर्षे यांचे कडुन आरोपी तोहीद खान वल्द सलमान खान वय ३५ वर्ष रा. शिव सुंदर नगर, वाठोडा, नागपूर याने ५,०००/- रू उधार घेतले होते. याच उधारीचे पैश्याचे कारणावरून आरोपीने फिर्यादीस लाकडी चल्लीने पायावर, छातीवर, कानावर मारून जखमी केले, जखमीचा उपचार मेडीकल हॉस्पीटल येथे करण्यात आला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि. पाटील यांनी आरोपीविरूध्द कलम ३२४, ५०४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ दखल घेवुन आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुटुंबातील “ती” च्या कडून मुलांना मिळते आत्मविश्वासाचे बाळकडू, मनपाच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

Tue Mar 12 , 2024
नागपूर :- आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकच क्षेत्रात महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर महिलांनी हवे ते यशोशिखर गाठले आहे. महिलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाची उणीव नाही, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर खचून न जाण्याचा आत्मविश्वास मुलांना कुटुंबातील “ती”च्या कडून अर्थात आजी, आई, बहिण यांच्याकडून मिळतो, त्यांना बघून समाजात वावरताना हवे असणारे आत्मविश्वासाचे बाळकडू मिळत असते, असे एकमत मनपाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com