संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जिल्हा वार्षिक योजना (नागरी सुविधा जनसुविधा) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास, 20% सेस फंड ई. योजनांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपुरच्या प्रा अवंतिका लेकुरवाडे व कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मल्लेवार यांच्या विशेष प्रयत्नाने बिडगावला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला. सदर निधी हा मार्च 2023 ला मंजूर करण्यात आला व आता पावसाळा सुद्धा सुरू झाला आहे. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकाही कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. म्हणून आज 30 जून ला प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे व आशिष मल्लेवार यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बिडगाव येथे प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाने ८ दिवसात सर्व कामे सुरू करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. ८ दिवसात कामे सुरू न झाल्यास प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे आणि आशिष मल्लेवार यांच्या नेतृतवाखाली आंदोलनात्मक प्रवित्रा धारण करू असे सर्व नागरिकांनी सांगितले. प्रसंगी सरपंच निकेश कातुरे, ग्रा.पं.सदस्य सविता पंचबुधे, ग्रा.पं. सदस्य मनीषा कुमरे, ग्रा.पं.सदस्य वैशाली कोकुर्डे, ग्रा.पं. सचिव बोंद्रे, प्रमोद पटले, महेश केसरवाणी, सतीश बरडे, अरुण कोकुर्डे विष्णू अघम, शिवानंद शहारे, दिगांबर हजारे, अनिल झोडगे, जानकीप्रसाद ठाकरे, राजू बागडे, अश्वजीत रामेटेके, मनोहर मटाले, प्रभाकर जुनघरे, पुंडलिक खापेकर, रंजना मेश्राम, लक्ष्मी चौधरी, पूजा राणा, ज्योती शाहू, आणि बिड्गाव येथील प्रचंड संख्येने नागरिक उपस्थित होते.