देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी मोदींचे नेतृत्व बळकट करा, भाजपच्या विविध आघाडी मेळाव्यात सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मनासा (मध्य प्रदेश) :-विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावर भारताला प्रत्येक क्षेत्रात “नंबर वन” करण्यासाठी नवीनतम संकल्पनांसह अविश्रांत प्रयत्न सुरू केले आहेत; देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व बळकट करण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांची असून त्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन राज्याचे वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा येथे आयोजित संयुक्त मोर्चा संमेलनात ते बोलत होते. खासदार सुधीर गुप्ता, आमदार अनिरुद्ध मारू, आमदार दिलीपसिंह परिहार, जिल्हाध्यक्ष पवन पाटीदार, संघटन सचिव क्षितिज भट आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा मायावी राक्षसाप्रमाणे आहे; सतत खोटे बोलून जनतेला संभ्रमात टाकण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा प्रयत्न असतो, तो आपल्याला हाणून पाडायचा आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडे निष्ठा आहे, परिश्रमाची तयारी आहे, राष्ट्रभावना ओतप्रोत भरून आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही, नरेंद्र मोदी यांना आपल्यासारख्या निष्ठावान साथीदारांची आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्ही तयार रहा असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. कॉग्रेस ने महिला, युवक, आदिवासी, सामान्य जनता, व्यापारी कुणाचेच भले केलेले नाही. मुसलमानांना सतत हिंदुंविरोधात भडकविण्याचे काम करीत आली आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की जाती जातीत तेढ निर्माण करणे हाच कॉग्रेस चा कार्यक्रम आहे, त्यामुळे जनतेला आपण सावध केले पाहिजे.

पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत अन्न धान्य पुरविले, जे जगात कोणीही करू शकलेले नाही. माझा एकही देशबंधव संकटकाळात उपाशी झोपता कामा नये, हा एकच ध्यास घेऊन मोदीजी काम करीत होते, असे सांगून ना.श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले की युगपुरूष मोदीजींनी समाजातील आया बहिणींना जो सन्मान दिला आहे, त्याने तुमचे जीवन बदलून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे महिलांचे स्थान हे घरातील मंदिरात आहे असे सांगितले होते तसेच मोदीनी आजच्या काळात महिलांचे स्थान हे विकासाच्या मंदिरात आहे हे कृतीतून दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले. कोरोना काळात मोफत लसीकरण मोदींनीच केले. जगातील इतर कोणत्याही देशाला ते शक्य झाले नाही. गरीबांसाठी मोदींनी ३ कोटी बावीस लाख घरे बनवली आहेत. ही विकासाची गंगा अशीच वाहात रहावी असे वाटत असेल तर जनतेने पुन्हा मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

प्रारंभी त्यांनी मनासा शहरातील चौकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार करुन अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री स्व. सुंदरलाल पटवा, स्व. कुशाभाऊ ठाकरे यांच्या भूमीत आल्याचा आनंद झाल्याचे यावेळी ना मुनगंटीवार म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नगर परिषद सी.ओ. वासेकर को दी विदाई

Sat Jun 17 , 2023
रामटेक :-नगर परिषद रामटेक के मुख्याधिकारी ( सी.ओ.) मंगेश वासेकर को हाल ही में नगर परिषद अधिकारी-कर्मचारियों ने विदाई दी. मुख्य अधिकारी मंगेश वासेकर का हाल ही में तबादला हुआ था, उन्होंने केवल दस महीनेही रामटेक नगर परिषद मे अपना उत्तम कर्तव्य बजाया, उनका हाल ही में 31 मई को स्थानांतरण किया गया था और बताया जाता है कि वे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!