स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सुधीर मुनगंटीवार

आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 परिषदेचे उद्घाटन

मुंबई :-  स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या हातात आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग उद्योगाने देश उभारणीत आपला वाटा सकारात्मक पद्धतीने उचलावा. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी असतो, त्यामुळे या उद्योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मनोरंजन कर कमी करत या उद्योगाला मदत केली. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ठामपणे या उद्योगाच्या पाठी उभे आहोत.

मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, आज अमेरिकेत लाखो विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत, तर जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र (इंडॉलॉजी) अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. जगभरात भारताचे आकर्षण वाढले आहे. अशावेळी स्ट्रीमिंग उद्योगाने भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.

यावेळी हरित नागपाल, प्रसाद संगमेश्वरन, सत्रजीत सेन, शाहबाझ खान आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फडणवीस सरकार ने मैत्रय समुहाच्या चेअरमन ला सहकार्य केले - भाऊसाहेब किशोर गेडाम.

Thu Sep 15 , 2022
संदीप कांबळे विशेष म्हणजे  कामठी ता प्र 15 – लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांची दिनांक 14 सप्टेंबर 2022 ला नागपूर येथील पत्रकार भवन मध्ये पत्र परिषद संपन्न झाली. पत्र परिषदेला संबोधित करताना भाऊसाहेब म्हणाले मैत्रेय उद्योग समूहाच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर यांनी भारत देशातील 14 राज्यांमध्ये 125 कार्यालय उघडून 2 कोटी 16 लक्ष महिलांची फसवणूक केली व 2.5 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!