लोकसभा निवडणूक काळात शेअर बाजाराचा जलवा; Nifty, Sensex भिडले गगनाला

मुंबई :- देशात लोकसभा निवडणूक 2024 चे वारे वाहत आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आता राजकीय पक्ष, नेते, मुद्यांपेक्षा शेअर बाजार चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शेअर बाजार गेल्या दोन दिवसांपासून रेकॉर्डवर रेकॉर्ड रचत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. निफ्टीने पहिल्यांदा 23,000 अंकांचा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने बाजार सुरु होताच 15 मिनिटांमध्ये 75,558 चा नवीन रेकॉर्ड रचला. बजाज फायनान्स, एलअँडटी, टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक या कंपन्यांचे या घौडदौडीत मोठे योगदान दिसले.

अगोदर फडकावले लाल निशाण

शेअर बाजाराची सुरुवात लाल निशाणाने झाली. सेन्सेक्स 82.59 अंक घसरला. तर निफ्टी 36.50 अंकांनी कमजोर झाला होता. पण ही घसरण आणि मरगळ जास्त वेळ टिकली नाही. निफ्टीने लागलीच इतिहास रचला. निफ्टी पहिल्यांदा 23 हजार अंकांच्या पुढे गेली. गुरुवारी पण शेअर बाजारात जोरदार तेजीचे सत्र दिसून आले. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला. सेन्सेक्स काल 75,400 अंकावर पोहचला. तर निफ्टी 22,993 अंकांवर पोहचली.

मिडकॅप इंडेक्स नवीन उच्चांकावर

मिडकॅप इंडेक्सने शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा 52,500 रुपयांचा टप्पा पार करुन रेकॉर्ड केला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमधील तेजीमुळे हा करिष्मा झाला. परदेशी गुंतवणूकदारांनी चालाखी दाखवली असली तरी भारतीय गुंतवणूकदारांनी बाजाराला पाठिंबा दिला. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराने नवीन इतिहास रचला आहे.

BSE भांडवल सर्वकालीन उच्चांकावर

बीएसईचे बाजारातील भांडवल उच्चांकावर पोहचले आहे. त्याने पहिल्यांदाच 421.09 लाख कोटींचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत 420 लाख कोटींचा रेकॉर्ड बीएसईच्या नावावर होता. सध्या बीएसईवर 3129 शेअरमध्ये ट्रेड होत आहे. त्यातील 1743 शेअरमध्ये उसळी दिसून आली आहे. तर 1263 शेअरमध्ये घसरण दिसून आली. 123 शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. या शेअरपैकी 101 शेअरला अपर सर्किट लागले आहे. तर 61 शेअरमध्ये लोअर सर्किट लागलेले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘बुद्धं सरणं गच्छामि’च्या स्वरात निनादला श्रामणेर सोहळा

Fri May 24 , 2024
– 81 बालकांना श्रामणेर दीक्षा – दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ – भदन्त ससाई यांच्याकडून त्रिशरणासह दशशील ग्रहण नागपूर :- प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे (2 हजार 568 वी बुद्ध जयंती) तीन दिवसीय बुद्ध महोत्सवाला प्रारंभ झाला. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com