नागपूर :- नागपूर विद्यापीठाने सिनेट निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु जुन्या मतदारांना बी फार्म भरण्यासाठी फक्त 5 दिवस दिल्याने या अन्यायकारक परिपत्रका विरोधात आज सिनेट परिवर्तन पॅनल, बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट असोसिएशन, भीम आर्मी, बुद्धिस्ट स्टुडंट्स असोसिएशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, प्रहार जनशक्ती, शिक्षक भारती आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी यांची भेट घेऊन त्यांना निवडणुका पुढे ढकलणे व बी फार्म भरण्याची मुदत 2 महिने वाढविण्या विषयी निवेदन दिले.
शिष्टमंडळात माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत डेकाटे, शीलवंत मेश्राम, उत्तम शेवडे, अंकित राऊत, अमोल थुल, शबाना शेख, राजेश बोढारे, आशिष तीतरे, निलेश महुरकर, सपन नेहरोत्रा, शामराव हाडके, सिद्धार्थ फोपरे, सुनील लांडे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
निवेदनात ए फॉर्म भरण्यासाठी (नवीन नोंदणी) 3 महिन्याची मुदत व बी फार्म भरण्यासाठी (जुने मतदार) फक्त 5 दिवस या पक्षपाती विरोधा भासावर शिष्टमंडळाने कुलगुरु सोबत चर्चा केली. प्राप्त परिस्थितीचा विचार करून व विविध संघटनांचे आक्षेप नोंदवून तारीख वाढविण्या संदर्भात विचार करण्याचे आश्वासन दिले. जर ही तारीख वाढली नाही तर विद्यापीठा पुढे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिष्टमंडळाने कुलगुरू ह्यांना दिला.