– संदर्भ – क्र./मस/नाग (ग्रा)/निवडणूक/कावि -३०२/२०२३ दि. २५-८-२०२३ अन्वये. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ काम न करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत.
नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) नागपूर जिल्हा कमिटी तर्फे उपजिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी प्रवीण मेहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ.अजय डवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी (NMC) डॉ.नरेंद्र बहिरवार यांना निवेदन सादर करण्यात आले. ग्राम अधिकारी तथा निवडणूक पर्यवेक्षक वीरगाव यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशन, नागपूर शहर येथे नरसाळा यूपीएचसी अंतर्गत असणाऱ्या १४ आशा स्वयंसेविका यांचे वर बीएलओ काम करीत नसल्यामुळे तक्रार दाखल केली ती रद्द करण्यात यावी. आशा स्वयंसेवीका कामावर आधारित मोबदल्या अंतर्गत स्वयंसेविका म्हणून ती काम करते. विधवा घटस्फोटीत किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना स्वयंसेविकेचे काम देण्यात येतात. महिला व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका यांना कार्यक्षेत्र सोडून जाता येत नाही. त्यावेळेस माता मृत्यू किंवा बालमृत्यू झाल्यास आशा स्वयंसेविका यांना दोषी ठरवण्यात येते. त्यामुळे इतर काम करण्यास त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मनाई आदेश जारी करण्यात आलेला आहे.
पत्र क्रमांक -१) जा.क्र./आरोग्य/१३४/२०१९ दिनांक -११ जुलै २०१९ हे अनुषंगाने आशा स्वयंसेवीका निवडणूक विषयक कामकाजाची जबाबदारी न देण्याबाबत.
२) जिआअ जिप धुळे यांचेकडील पत्र क्रमांक/ जीआ साधू /D-५०३/२०२२-२३ दि. १०-१०-२०२२.
आशा स्वयंसेविका यांचे वर कोरोना काळापासून कामाच्या बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित असलेले काम किंवा इतर काम आशांनी केल्यास त्यांना कार्यमुक्त करण्यात येईल असे आदेश असताना आशांनी काय करावे ? आशा स्वयंसेविका यांचे वर आरोग्य विषयक कामाचा बोजा जास्त असल्यामुळे आशा वर्कर यांना निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजातून वगळण्यात यावे. तसेच ज्या आशा वर्कर वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावे.
याविषयी जिल्हा अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे, महासचिव कॉ.प्रीती मेश्राम यांचे नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले. सोबत पीडित सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या. वरील पत्र राज्याचे आरोग्यमंत्री व राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त मुंबई यांना सुद्धा पाठविण्यात आले.