आशांच्या विषयी योग्य निर्णय न घेतल्यास कोरोना लाटे च्याआधीच संपावर जाणार – राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड प्रीती मेश्राम

नागपूर :-आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) नागपूर जिल्हा तर्फे पत्र परिषदेतून कॉ.राजेंद्र साठे, कॉ. प्रीती मेश्राम, कॉ. रंजना पौनीकर यांनी सूचित करण्यात केले आहे की, 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा वर्कर व गटप्रवर्तक काम करीत आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची महत्वाची जिम्मेदारी आशा वर्कर यांच्यावर असतो. कोरोनाचे संकट काळामध्ये भारताला महामारी पासून मुक्त करण्याकरता अशा वर्कर यांनी विना मोबदला मोठी जिम्मेदारी पार पाडलेली आहे परंतु केंद्र शासन किंवा राज्य शासन यांचे तर्फे त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला देण्यात आलेला नाही. नवीन प्रकारच्या कोणताही रोग पसरण्याची संभावना दिसली की आशा वर्कर यांचे वर्ग बनवून विनाम बदला काम करून घेण्याचे षटयंत्र शासनातर्फे चालत असतात सध्या सुरू असलेल्या गोवर रूबेला या रोगाबद्दल सुद्धा तसेच घडत आहेत पुढे येणाऱ्या कोरोना वारीयंट मध्ये सुद्धा आशा वर्कर यांचे वर मोठी जिम्मेदारी देण्याचे तयारी केंद्र आणि राज्य शासनाने ठेवलेली आहे. परंतु त्यांच्या कामाच्या मोबदला द्यायला कोणीही तयार नाही. आशा वर्कर या विधवा घटस्फोटीत किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून त्यांना आर्थिक संयोगाची गरज ही असते त्यातूनच त्या हे काम करीतअसतात. त्यांचे सोबतच त्यांच्या रेकॉर्ड अपडेट करण्याचे काम त्यांच्या सुपरवायझर म्हणून गटप्रवर्तक करीत असतात त्यांना सुद्धा ही वेगळा कोणताही मोबदला देण्यात येत नाही. आम्ही शासनाला सूचना करू इच्छितो दोन महिन्यापासून गोवर रूबेलाचे प्रति दिवस 100 घरांचे सर्वे करायला लावण्यात येत आहेत. परंतु कोणताही मोबदला आशा वर्कर ला देण्यात आलेला नाही पुढे येणाऱ्या नवीन कोरोना वारीयंट मध्ये सुद्धा आशांवर जिम्मेदारी सोपण्याची शासनाची तयारी आहे. आशा वर्कर ला कामा नुसार योग्य मोबदला देण्याची शासनाने तयारी दर्शवली नाही तर, नवीन येणाऱ्या कोरोना वारीयंट मध्ये काम करण्याचा शासनाने ठरवलेला निर्णय आशा वर्कर व गटप्रवर्तक धुलकाऊन लावतील अशी आम्ही सूचना देत आहोत. मागण्यापुढीलप्रमाणे आहेत.

१) आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या दर्जा द्या.

२) आशा व गट प्रवर्तक यांना किमान वेतन २६ हजार देण्यात यावे.

३) आशा व गटप्रवर्तक यांच्या परिवारास मोफत आरोग्य विमा लागू करा.

४) दिवाळीनिमित्त सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना १० हजार रु. भाऊबीज देण्यात यावी.

JSY अंतर्गत APL/BPL अट रद्द करून सरसकट मोबदला द्या. वरील मागण्याकरता आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचा राज्यस्तरीय विशाल मोर्चा दुपारी बारा वाजता बालभवन सुभाष रोड येथून निघणार. सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला नाही तर, कोरोनाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक बेमुदत संपावर गेल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा पत्रपरिषदेत कॉ.राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, रुपलता बोंबले, कांचन बोरकर उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत माहे डिसेंबर २०२२  मध्ये २८८१ माताच्या बँक खात्यात राष्ट्रीय स्तरावरुन रक्कम वर्ग 

Fri Dec 23 , 2022
गडचिरोली : प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत गरोदरपणा पासुन ते बाळाच्या जन्मा पर्यंत तिन टप्प्यात ५०००/- रुपये मिळतात. या साठी १५० दिवसांचे आत शासकीय संस्थेत गरोदरपणाची नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र या योजने अंतर्गत मातांचा बँक खात्यावर अनुदाची रक्कम वर्ग करण्यासाठी असलेल्या सुविधेत काही महिन्यापासुन राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती. ही अडचण दुर होताच आरोग्य प्रशासनाने एकुण २८८१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com