उष्मघाताने मृत्यू पावलेल्या अनोळखी इसमाची ओळख पटली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 :- कन्हान रेल्वे स्टेशन प्लेट फार्म नं.१ वर एक अनोळखी व्यक्ती भोवळ पडलेल्या परिस्थितीत आढळल्याने त्यास उपचारार्थ कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्याचा मुत्यु झाल्याने त्याचा उष्मघाताने मुत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असता मृतदेहावर पुढील उत्तरीय तपासणी करण्यासाठी कामठीच्या शासकोय उप जिल्हा ग्रामिण रूग्णालयात हलविण्यात आले .ही घटना 24 मे ला घडली असून या अनोळखी मृतकाची ओळख पटली असून मृतकाचे नाव प्रीतमलाल हरर्कंडे वय 45 वर्षे रा मरारटोला ,तह आमगाव जील्हा गोंदिया असे आहे.
मृतकाच्या नातेवाईक आज कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पोहोचताच मृतकाची ओळख पटवून घेतल्या नंतर मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.मृतकाच्या पाठिमागे कुटुंबात पत्नी 2 मुलं, 1 मुलगी असा आप्तपरिवार असून सदर मृतक हा व्यवसायाने धोबी असून आपल्या कुटुंबात हा कमी वास्तव्यास राहत असून बरेच दिवस हा घरी परतला नव्हता तर मात्र थेट याचा मृतदेहच कुटुंबाच्या स्वाधीन आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!