नागपुर :- राज्यस्तरीय 19 वर्षाआतील मुले व मुली शालेय खो-खो क्रीडा स्पर्धाचे आयोजन तालुका क्रीडा संकुल, काटोल येथे करण्यात आले होते. या स्पर्धा लिग कम नॉक आऊट पध्दतीने आयोजित आल्या होत्या. परंतु मुसळधार पावसामुळे या स्पर्धा नबिरा महाविद्यालयामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेचा समारोप आज क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा परीषद सदस्य सलील देशमुख, तहसिलदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजु रणविर, नगर परीषद मुख्याधिकारी तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे सदस्य धनंजय बोरीकर, अॅड. दिपक केने, अनुप खराडे, प्राचार्य डॉ. सुनिलकुमार नवीन, नबिरा महाविद्यालय, प्राचार्या सुजाता गांधी, ऑर्कीड पब्लीक स्कुल, शेखर कोल्हे, गणेश चन्ने, शब्बीर शेख, मा. डॉ. अनिल ठाकरे यांचे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.
तीन दिवसीय स्पर्धेमध्ये मुलींच्या गटात प्रथम क्रमांक श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय, धाराशिव (लातुर विभाग), व्दितीय क्रमांक श्रीराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज पंचवटी, नाशिक (नाशिक विभाग), तृतिय क्रमांक श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी (कोल्हापुर विभाग) तसेच मुलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय, धाराशिव (लातुर विभाग), व्दितीय क्रमांक लोकविकास मराठी मिडीयम स्कुल, वेळापुर, ता. माळशिरस, जि. सोलापुर (पुणे विभाग) तृतिय क्रमांक गोविंदराव हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी, कोल्हापुर (कोल्हापुर विभाग) यांनी पटकविला.
स्पर्धेतील पंचाचा सत्कार करण्यात आला. तसेच या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यामध्ये ज्यांनी मदत केली अश्या सर्व क्रीडा शिक्षक व इतर मान्यवरांचा कार्यक्रमा दरम्यान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र कोतेवार, आभार प्रदर्शन परेश देशमुख यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच काटोल शहरातील विविध क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व क्रीडा शिक्षक यांनी सहकार्य केले.