संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेताजी चौकातील श्याम पान पॅलेस मधून अवैधरीत्या होणाऱ्या गुटखा व्यवसायावर धाड टाकण्यात पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही काल सायंकाळी साडे पाच दरम्यान केली असून या धाडीतून रजनीगंधा,पान पराग, मुसाफिर,विमल असे विविध प्रकारचे गुरखे अंदाजे किमती 5 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक आरोपीचे नाव श्यामलाल शर्मा वय 40 वर्षे रा केदारनाथ शर्मा यांच्या घरी भाड्याने नेताजी चौक कामठी असे आहे.अटक आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक राखुंडे, किशोर मालोकर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.