राज्यातील जंगल भ्रमंती कोव्हीड नियम पाळून सुरू ठेवा

पेंच टायगर रिझर्व्ह असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचे  मुख्यमंत्र्यांना निवेदन… 
रामटेक :- भारतासमोर असलेला तिसऱ्या कोविड लाटेचा धोका आणि महाराष्ट्रात वाढत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या पाहत महाराष्ट्र सरकारने नुकताच काही कडक निर्बंध राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सध्याची परिस्थिती पाहता अतिशय योग्यच आहे. या निबंधामध्ये बंद करण्याच्या नियमाखाली महाराष्ट्रातील स्पा, जलतरण तलाव, उद्याने, प्राणिसंग्रहालय, पर्यटन स्थळे, इ. बाबींचा समावेश केलेला आहे. तसेच या स्थळांमध्ये महाराष्ट्रातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प यांचाही समावेश करण्यात आल्याचे कळते.
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये अतिशय शिस्तबद्धरित्या पर्यटन चालते हे आपणास माहीत आहेच. शिवाय एकावेळ जंगलात किती माणसांना प्रवेश द्यायचा हेही निश्चित करण्यात आलेले आहे. आपल्या राज्यात वाढणारी रुग्णसंख्य पाहता ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने नुकत्याच काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या. त्यात ज्या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत अशाच पर्यटकांना प्रवेश, मार्गदर्शक व जिप्सी चालक यांनीही दोन डोस पूर्ण केले असल्यासच त्यांना जंगलात प्रवेश करण्याची मुभा, एका जिप्सीमध्ये सहा ऐवजी चारच पर्यटक असतील गाड्यांचे संपूर्ण सॅनिटायझेशन वगैरे अनेक निर्बंधांचा समावेश होता. हा निर्णय नक्कीच स्पृहणीय, गरजेचा आणि व्यवहार्य होता….
तसेच जंगलात काम करणारे निसर्ग मार्गदर्शक , जिप्सी चालक आणि आजूबाजूच्या हॉटेल , रिसॉर्ट मधून काम करणारे लोक हे त्यांना जंगलाव्दारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मिळणाऱ्या मोबदल्यावर अवलंबून आहे.
ही सर्व जंगले बंद झाली तर त्यांचाही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालं आहे. सर्व ठिकाणी सुरू असलेल्या  पर्यटकांना किमान चार महिने अगोदर बुकिंग करावी लागते  . इतर पर्यटन स्थळी तिकीट काऊंटर वर तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी जंगलाच्या प्रवेशद्वारावर होत नाही. एका वेळी प्रवेशद्वारातून किती गाड्या सोडाव्यात याबबदही  मर्यादा आहेत. शिस्तबद्ध रीत्या सुरू असलेलं हे निसर्ग पर्यटन काही अधिक निर्बंध लावून ठेवल्यास या पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांच्या दैनंदिन कमाईच्या प्रश्न मिटणार आहे.
असे निवेदन पेंच टायगर रीसर्व  असोसिएशन चे अध्यक्ष पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे , उपाध्यक्ष मोहबत तूली , सचिव विशाल वैद्य , LAC मॅनेजर स्वानंद सोनी ,कोषाध्यक्ष नवीन चौकसे , जिप्सी असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र वर्मा , गाईड असोसिएशन चे अध्यक्ष चंपलाल डोंगरे, यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , वन राज्य मंत्री , पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,यांना निवेदन दिले आहे…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

पोकराअंतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी -दादाजी भुसे

Wed Jan 19 , 2022
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा कृषीमंत्र्यांनी घेतला आढावा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सक्षम करण्याची संधी मुंबई, दि. 19 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये (NRM) होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन असून, या कामांना जिल्हा स्तरावर गती द्यावी, तसेच नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यात “वनशेती”स प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोकरा प्रकल्पाअंतर्गत या घटकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com