जिल्ह्यात धान खरेदीला सुरवात

भंडारा : भंडारा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे 50 लाख टन धान किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाकडून खरेदी केले जाते. सन 2022-23 या वर्षासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर केलेली आहेत.

पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत आज 11 नाव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते धान खरेदीचा शुभारंभ जिल्ह्यातील दि. भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा, दि. पिंपळगाव सहकारी भात गिरणी मर्या. पिंपळगांव ता. लाखनी व कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखनी ता. लाखनी या खरेदी केंद्राना प्रत्यक्ष भेट देवून करण्यात आला आहे.

धान खरेदी शुभारंभाला पुरवठा (उपायुक्त) नागपूर रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा पणन अधिकारी भारतभुषण पाटील व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी धान खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी प्रकिया पुर्ण करून आपले धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन येण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुरच्या महालेखापरिक्षक कार्यालयात 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरदरम्यान लेखापरीक्षण सप्ताहाचे आयोजन

Sat Nov 12 , 2022
नागपूर :-भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागा अंतर्गत नागपुरच्या सिव्हील लाईन्स स्थित लेखापरिक्षण -2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत लेखापरिक्षण (ऑडिट) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या ऑडिट सप्ताह अंतर्गत ऑडिट अहवाल प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, मॅरेथॉन, ऑडिट जागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान, निवृती वेतन कार्यशाळा, लेखापरीक्षा प्रश्नमंजुषा यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती क्षेत्रीय भारतीय लेखा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com