भंडारा : भंडारा हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे 50 लाख टन धान किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाकडून खरेदी केले जाते. सन 2022-23 या वर्षासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र मंजूर केलेली आहेत.
पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत आज 11 नाव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते धान खरेदीचा शुभारंभ जिल्ह्यातील दि. भंडारा सहकारी धान गिरणी मर्या. कारधा, दि. पिंपळगाव सहकारी भात गिरणी मर्या. पिंपळगांव ता. लाखनी व कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखनी ता. लाखनी या खरेदी केंद्राना प्रत्यक्ष भेट देवून करण्यात आला आहे.
धान खरेदी शुभारंभाला पुरवठा (उपायुक्त) नागपूर रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, जिल्हा पणन अधिकारी भारतभुषण पाटील व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी धान खरेदी करिता ऑनलाईन नोंदणी प्रकिया पुर्ण करून आपले धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी घेऊन येण्याचे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले आहे.