लढवय्ये नेते बावनकुळेंच्या पाठीशी ताकदीने उभे राहा! 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

• वयोवृद्ध नत्थूजी बांडेबुचे यांचे भावनिक आवाहन

• कामठीत बावनकुळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कामठी :- चंद्रशेखर बावनकुळे मागील २० वर्षांहून अधिक काळापासून कामठीची सेवा करीत आहेत. मतदारसंघातील विकासाचा ध्यास सतत जोपासणारे, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे लढवय्ये नेते आहेत, यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन कामठीतील ८० वर्षीय समाजकार्यकर्ते नत्थूजी बांडेबुचे यांनी केले. चंद्रशेखर, बेटा, तुला आशीर्वाद देतो. तू यशस्वी हो. हा मतदारसंघ तुला पाठिंबा देईल,” असे सांगत त्यांनी बावनकुळे यांना आशीर्वाद दिला.

गुरुवार दि. 7 नोव्हेंबर रोजी कामठी-मौदा विधानसभा क्षेत्राचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी शहराचा दौरा केला. शहरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला व घरोघरी भेटी दिल्या. कामठीतील तरुण कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून बावनकुळे यांचे जंगी स्वागत केले. या बाईक रॅलीमधून फिरतानाही बावनकुळे यांनी कामठीतील नागरिकांशी संवाद साधला.

संवाद मोहिमेत बावनकुळे म्हणाले, नत्थुजींनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं आहे. त्यांचे अनुभव अत्यंत मौल्यवान आहेत. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेरणेतून मी अधिक मेहनत घेईन, त्यांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

• गांधी चौकात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी शहऱातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांचे, माझ्या मतदार व नागरिकांचे कार्यालय असल्याचे श्री बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजू पारवे, मनीष बाजपेयी, लाला खंडेलवाल, पंकज वर्मा, चंद्रशेखर तुप्पट, उज्वल रायबोले, लालसिंग यादव, विजय कोंडुलवार, कपिल गायधने, कुणाल सोलंकी, कुंदा रोकड़े, रोशनी कानफाड़े, गायत्री यादव, दीपक नेटी, कुंदा रोकडे, गायत्री यादव, माजी नगरसेवक लालसिंग यादव, दिनेश शरण, पिक्कू यादव, आशू अवस्थी, अशफाक शेख, संदीप भनारे, दीपक नेटी, सोनू अमृतकर, अमित ठाकूर, सुमित शर्मा, धीरज सोळंकी, रोहित तरारे, राजा कुरील, अभिनव यादव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बार्टीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस साजरा

Fri Nov 8 , 2024
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र बार्टी नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस, दिनांक 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असल्याचे सांगीतले. शिकले, शिकवले, सर्वांना संघटीत केले. त्यांच्या या कार्याच्या सन्मानार्थ शासनाने 2017 पासून 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!