अंतःकरणात निर्मळ असा भाव निर्माण करणारा श्रीमद भागवत कथा, आचार्य राममूर्ती मिश्र यांचे प्रतिपादन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी :- गेल्या 39 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास कॅन्टोन्मेंट कामठी येथे कन्हान नदीच्या तीरी असलेल्या योगासन ध्यान केंद्र महादेव घाट येथे स्वर्गीय प्रभुदत्त ब्रम्हचारी महाराज यांच्या प्रेरणेने येथील भागवत कथा सप्ताहाचा प्रारंभ 17 डिसेंबर ला करण्यात आला. गुरू ने दिलेल्या वचनाचा मान राखत आजपर्यंत कोरोना सारख्या काळात ही आचार्य राममूर्ती ह्यांनी येथे दरवर्षी खंडित होऊ नये म्हणूनही पाठ केला होता हे विशेष अत्यंत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत भागवत पारायणाला केले होते, ह्यावेळी 17 डिसेंबर ला पूजन करून पारायणास सुरु वात करण्यात आली.

श्रीमद भागवत कथा हा ग्रंथ म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणा मध्ये एक निर्मळ असा भाव निर्माण करणारा ग्रंथ आहे. आपला भाव शुद्ध ठेवून जर कथा श्रवण केली किंवा या ग्रंथाकडे जर भाव शुद्ध ठेवून बघितलं तर हा ग्रंथ कृपा करीत असतो, असे आचार्य राममूर्ती यांनी सांगितले.

भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत, तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे. भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञानयज्ञ सोहळा आहे. त्यामुळे त्यातील तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे, असे आवाहन ही त्यांनी श्रोत्यांना केले.

भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचे उत्थान व्हावे आणि हयात असेपर्यंत जीवनात परमोच्च अत्यानंदाची अनुभुती घेता यावी, यासाठी आचार्य राममूर्ती ह्यांनी मार्गदर्शन केले. अत्यंत रमणीय स्थळ म्हणून योगासन ध्यान केंद्र महादेव घाट कन्हान नदीच्या तीरी कॅन्टोन्मेंट येथे स्थित आहे, सोबत आयोजक ही संस्था आहे. दररोज 1 ते 5 पर्यंत चालणारी ह्या कथा ला 23 डिसेंबर ला विराम करून रविवारी प्रसाद चा कार्यक्रम ठेवण्यात आला, अध्यक्ष महेंद्र वाही, प्रकाश सुखीजा, महादेव वैद्य, मोंटू बुटानी, राधेश्याम खत्री, वीरेंद्र कलनत्री, सारंग चौकसे, बिल्लू यादव, चंदू शिवरकर, नंदू चिखले, महेश अग्रवाल, सुरेश शर्मा, संजय तिवस्कर, राजेश देशमुख व इतर सर्व सदस्थ्याणी कार्यक्रम सफल करिता मेहनत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एमओसी कैंसर केयर एंड रिसर्च सेंटर, गोकुलपेठ, नागपुर में 15 दिसंबर को पहली वर्षगांठ समारोह बड़े उत्साह के साथ मनाया गया

Sat Dec 23 , 2023
नागपूर :- एमओसी कैंसर केयर एंड रिसर्च सेंटर, गोकुलपेठ, नागपुर में 15 दिसंबर को पहली वर्षगांठ समारोह बड़े उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर एमओसी नागपुर के माध्यम से कैंसर पर सफलतापूर्वक विजय पाने वाली 70 महिलाएं उपस्थित रहीं और उन्होंने कार्यक्रम की शोभा बढ़ाई। इन सभी कैंसर योद्धाओं को स्वस्थ तुलसी का पौधा देकर सम्मानित किया गया। […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com